Samajwadi Party Candidates List: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार डिंपल यादव यांच्या नावाचाही समावेश आहे.
लोकसभेसाठी 'सपा'चे १६ उमेदवार जाहीर
- संभल (०७) शफीकुर रहमान बुर्के
- फिरोजाबाद (२०) अक्षय यादव
- मैनपुरी (२१) डिंपल यादव
- एटा (२२) देवेश शाक्य
- बदायूं (२३) धर्मेंद्र यादव
- खेरी (२८) उत्कर्ष वर्मा
- धौरा (२९) आनंद भदौरिया
- उन्नाव (३३) अनु टंडन
- लखनौ (३५) रविदास मेहरोत्रा
- फारुखाबाद (४०) डॉ. नवल किशोर शाक्य
- अकबरपूर (४४) राजाराम पाल
- बौदा (४८) शिवशंकर सिंग पटेल
- फैजाबाद (५४) अवधेश प्रसाद
- आंबेडकर नगर (५५) श्री लालजी वर्मा
- बस्ती (६१) रामप्रसाद चौधरी
- गोरखपूर (६४) श्रीमती काजल निषाद
मागील अर्थात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले होते. ज्या राज्यातून केंद्रातील सरकारचा मार्ग ठरवला जातो त्या उत्तर प्रदेशात ८० लोकसभेच्या जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला ८० पैकी ६२ जागा जिंकण्यात यश आले होते. तर समाजवादी पार्टीला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. याशिवाय मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टीचे १० खासदार निवडून आले होते. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती, तर अपना दलाला दोन जागा मिळाल्या होत्या.