शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
3
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
4
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
5
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
6
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
7
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ
8
महिन्याला ३ हजाराची SIP करा अन् करोडपती व्हा! समजावून घ्या एसआयपीचं गणित
9
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
10
१ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या
11
अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत
12
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
13
Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
14
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
15
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
16
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
17
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
18
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
19
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
20
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार

Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशात भाजपच्या मित्रपक्षांना मोठा झटका, ६० पेक्षा अधिक लहान पक्षांनी खाल्ला मार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 6:01 AM

Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात सक्रिय असलेल्या या दोन्ही पक्षांना त्यांच्या समाजाची मते भाजपच्या उमेदवारांना मिळवून देण्यातही अपयश आले आहे.

- राजेंद्र कुमार

लखनौ : २०१७ मध्ये भाजप ज्या मित्रपक्षांसह उत्तर प्रदेशात सत्तेवर आला होता त्यांना या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत आलेल्या राष्ट्रीय लोकदलाला सोडले तर एडीएचा भाग असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्ष  आणि निषाद पक्षालाही विजय मिळवता आला नाही. 

उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात सक्रिय असलेल्या या दोन्ही पक्षांना त्यांच्या समाजाची मते भाजपच्या उमेदवारांना मिळवून देण्यातही अपयश आले आहे. भाजपचा मित्रपक्ष अपना दल (एस) देखील एक जागा जिंकू शकला. लहान पक्षांमध्ये, रालोदने आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यात यश मिळविले, तर प्रथमच निवडणूक रिंगणात असलेल्या आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी विजय मिळविला आहे.

एनडीएचा भाग असलेल्या आणि यूपीमधील अत्यंत मागासलेल्या लोकांचे राजकारण करणाऱ्या सुभासपसाठी ही निवडणूक मोठी धक्कादायक ठरली. सुभासपचे प्रमुख ओपी राजभर हे योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपने या पक्षासाठी घोसी जागा सोडली होती. या जागेवरून ओपी राजभर यांनी त्यांचा मुलगा अरविंद राजभर यांना उतरविले होते. मात्र, ओपी राजभर आपल्या मुलाला निवडणुकीत जिंकून देण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे निषाद पक्षाचे प्रमुख त्यांचे पुत्र प्रवीण निषाद यांना संत कबीरनगर मतदारसंघातून निवडून देऊ शकले नाहीत.

छोट्या पक्षांचे डिपॉझिट जप्तयूपीमध्ये ओवैसी यांच्या एआयएमआयएम आणि अपना दल (के) यांनी एकत्र निवडणूक लढवली होती; परंतु या आघाडीने अतिशय खराब कामगिरी केली. त्यांच्या सर्व उमेदवारांना त्यांचे डिपॉझिटही वाचविता आले नाही, तसेच स्वराज भारतीय न्याय पक्ष, अखिल भारतीय अपना दल, भारतीय पंचशील पक्ष, मानवधिकार पार्टी तसेच स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राष्ट्रीय शोषित समाज पक्षालाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यूपीमध्ये ६० हून अधिक छोट्या पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते; परंतु कोणालाही निवडणूक जिंकण्यात यश आले नाही. बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा