रामललांची जन्मभूमी असलेली अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येते तिथे भाजपाच्या झालेल्या पराभवाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील नव्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात रामलाट आल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र ज्या अयोध्येतील राम मंदिर आंदोलनामुळे भाजपाला उभारी मिळाली. तिथेच भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर भाजपा समर्थकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. मात्र फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून जे आकडे येत आहेत, त्यामधून वेगळंच चित्र समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार अयोध्या विधानसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली आहे.
अयोध्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाला १ लाख ४ हजार ६७१ मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाला १ लाख ४ हजार मतं मिळाली आहे. अशा प्रकारे अयोध्येमधून भाजपाच्या उमेदवाराला ४ हजार ६६७ मतांची आघाडी मिळाली आहे. मात्र अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील कुठल्या विधानसभेतून कुणाला किती मतदान १- अयोध्या विधानसभा मतदारसंघसमाजवादी पार्टी - १ लाख ४ भाजपा - १ लाख ४ हजार ६७१
२ - रुदौली लोकसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - १ लाख ४ हजार ११३भाजपा ९२ हजार ४१०
३ - मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - ९५ हजार ६१२ भाजपा ८७ हजार ८७९ ४ - विकासपूर विधानसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - १ लाख २२ हजार ५४३भाजपा - ९२ ८५९
५) दरियाबाद लोकसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - १ लाख ३१ हजार २७७भाजपा - १ लाख २१ हजार १८३
असं आहे अयोध्येतील जातीय समिकरण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या झालेल्या पराभवाचं सर्वात मोठं कारण येथील जातीय समिकरणं ठरली आहेत. अयोध्येमध्ये ओबीसी मतदार सर्वाधिक आहेत. ओबीसींची संख्या २२ टक्के आहे. तर दलिताची संख्या २१ टक्के आहे. त्याशिवाय मुस्लिमांची संख्याही १८ टक्के आहे. या तिघांचाही आकडा मिळून ५० टक्क्यांहून अधिक आहे. यावेळी ओबीसी मतदारांचं एकत्र येणं. तसेच दलित मतदार आणि मुस्लिम यादव मतदारांनी केलेलं एकगठ्ठा मतदान भाजपाच्या पराभवाचं कारण ठरलं होतं.