शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

मिशन 2024: उत्तर प्रदेशात भाजपची पॉवर वाढणार; 3 पक्ष NDA मध्ये सामील होण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 4:16 PM

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत, त्यामुळे सर्व पक्ष या राज्यासाठी विशेष रणनीती आखत आहेत.

Loksabha Election: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक INDIA आघाडीमध्ये विविध पक्षांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, तर भारतीय जनता पक्षही एनडीएमधील पक्ष वाढवण्यावर भर देतोय. भाजपने नुकतीच 38 पक्षांसोबत एनडीएची बैठक घेतली, आता आणखी चार पक्ष या संघटनेत सहभागी होऊ शकतात. उत्तर प्रदेशातील तीन आणि बिहारमधील एक प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पक्षासोबत येऊ शकतात. हे पक्ष भाजपसाठी नक्कीय फायदेशीर ठरू शकतात.

उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 80 खासदार लोकसभेवर निवडून जातात. असे म्हटले जाते की, उत्तर प्रदेश जिंकले तर संसदेचा मार्ग सोपा होतो. त्यामुळेच सर्वजण उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष देत आहेत. यातच आता मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील प्रगतीशील मानव समाज पार्टी (बिंध समाज), जनवादी पार्टी आणि महान दल एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. तर मुकेश साहनी यांचा बिहारमधील व्हीआयपी पक्षही एनडीएचा भाग होण्याच्या तयारीत आहे.

भाजपला या तीन पक्षांचा फायदा?प्रगतीशील मानव समाज पक्षाचे अध्यक्ष प्रेमचंद बिंद आहेत. पक्ष केवट समाजाशी संबंधित असून, अति मागास समाजामध्ये पक्षाची चांगली पकड आहे. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीतही या पक्षाने भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु जागांबाबत बोलणी होऊ शकली नाहीत. दुसरीकडे जनवादी पक्षाच्या संजय चौहान यांचे समाजवादी पक्षाशी जवळचे संबंध होते. त्यांनी सपासोबत चंदौलीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला.

याशिवाय, केशव देव मौर्य यांचा पक्ष महान दल देखील एनडीएमध्ये सामील होण्यास तयार आहे. पक्षाचा दावा आहे की, रोहिलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांची पकड आहे. विशेष म्हणजे एनडीएमध्ये सामील होण्यास तयार असलेल्या यूपीतीय या तिन्ही पक्षांनी यापूर्वी समाजवादी पक्षाशी युती केली आहे.

युपीत भाजप मजबूत2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप एनडीएला मजबूत करत आहे. यूपीमधील इतर अनेक पक्षही एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष, संजय निषाद यांच्या पक्षाचाही समावेश आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने युपीत 64 जागा मिळवल्या होत्या, तर बसपाला 10 आणि सपाला 5 जागा मिळाल्या. गत निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी