प्रयागराज - पती पत्नीमध्ये किरकोळ वाद होतच असतात. जर पती-पत्नीमधील लहानसहान वादांना घटस्फोट कायद्यांतर्गत क्रूरता म्हणून पाहिले जाऊ लागले, तर अनेक विवाह तुटतील आणि प्रत्येकजण या आधारावर घटस्फोट घेण्यास सुरुवात करेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंग आणि न्यायमूर्ती शिवशंकर प्रसाद यांच्या खंडपीठाने गाझियाबादच्या रोहित चतुर्वेदी यांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर थेट परवानगी न देता वेगळे राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याला कायदेशीररित्या विभक्त होण्याचे निर्देश देताना ही टिप्पणी केली.
आरोप काय?- याचिकाकर्त्याने पत्नीवर बेकायदेशीर वैवाहिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. - ज्या दाम्पत्याच्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती त्यांचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. पत्नीने लग्नानंतर काही महिन्यांतच नांदायला नकार दिला आणि ती सतत आई-वडिलांशी भांडण करत असे, असा आरोप पतीने केला.