शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

अपहरण आणि खंडणीचे प्रकरण भोवले; माजी खासदार धनंजय सिंह यांना ७ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 5:08 PM

Dhananjay Singh : अपहरण आणि खंडणी प्रकरणी मंगळवारी न्यायालयाने माजी खासदार धनंजय सिंह आणि त्यांच्या साथीदार संतोष विक्रम यांना दोषी ठरवले होते

Dhananjay Singh : जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर न्यायालयाने बुधवारी अपहरण आणि खंडणी प्रकरणी  माजी खासदार धनंजय सिंह यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण आणि खंडणी प्रकरणी मंगळवारी न्यायालयाने माजी खासदार धनंजय सिंह आणि त्यांच्या साथीदार संतोष विक्रम यांना दोषी ठरवले होते. यानंतर आज न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे.

मुझफ्फरनगरचे रहिवासी नमामी गंगेचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांनी १० मे २०२० रोजी लाइन बाजार पोलिस ठाण्यात धनंजय सिंह आणि त्यांचा साथीदार संतोष विक्रम यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. संतोष विक्रम याने दोन साथीदारांसह फिर्यादीचे अपहरण करून धनंजय सिंह यांच्या निवासस्थानी नेले. 

यानंतर धनंजय सिंह यांनी पिस्तुलचा धाक दाखवून शिवीगाळ केली आणि फिर्यादीवर हलक्या दर्जाचे साहित्य पुरवण्यासाठी दबाव टाकला. तसेच, फिर्यादीने नकार दिल्याने धनंजय सिंह यांनी त्याला धमकावून खंडणी मागितली. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी धनंजय सिंह यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी न्यायालयाने धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांना दोषी ठरवून तुरुंगात रवानगी केली होती. यानंतर आज न्यायालयाने धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

आता निवडणूकही लढवता येणार नाहीसध्या मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने दोघांनाही दोषी घोषित केले असून आता त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार धनंजय सिंह यांना मोठा झटका बसला आहे. याचाच अर्थ त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. धनंजय सिंह २०२४ मध्ये जौनपूर लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावण्याच्या तयारीत होते. यासाठी तयारीही सुरु केली होती.

२७ व्या वर्षी पहिल्यांदा बनले आमदारवयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी धनंजय सिंह यांनी २००२ ची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. यामध्ये विजय मिळवून विधानसभेत पोहोचलेले धनंजय सिंह २००७ मध्ये जनता दल युनायटेड (JDU) च्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. २००९ ची लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली. संसदेत जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. धनंजय सिंह यांनी २०२२ च्या यूपी निवडणुकीत जेडीयूच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय