शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

हृदयद्रावक! 5 मुलींनंतर मुलगा झाला पण रुग्णालयातून चोरीला गेला, हतबल आई म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 5:44 PM

रुग्णालयातील महिला वॉर्डमधून आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना घडली.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील महिला वॉर्डमधून आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना घडली. ज्या महिलेचं बाळ चोरीला गेलं तिला आधीच 5 मुली आहेत. सध्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रुग्णालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेहत भागात राहणाऱ्या शहरीन नावाच्या महिलेला आधीच पाच मुली आहेत. 14 तारखेला पाच मुलींनंतर तिला मुलगा झाला. पण आज सकाळी हॉस्पिटलमधून तिचं बाळ कोणीतरी चोरून नेलं. हा प्रकार नातेवाईकांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रडून रडून आईची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शहरीन सांगते की, ती पहाटे चार वाजेपर्यंत जागे होती. मुलगा तिच्या बाजुला झोपला होता.  तिला जाग आली तेव्हा मुलगा बेपत्ता असल्याचे तिच्या निदर्शनास आले. एक महिला अनेक दिवसांपासून रुग्णालयात फिरत होती, असे सांगण्यात येत आहे. तो शहरीनशीही बोलली होती. रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत असं सांगितलं. याच महिलेने शहरीनचे बाळ नेल्याची भीती व्यक्त होत आहे. सीसीटीव्हीत एक महिला मुलाला घेऊन जातानाही दिसत आहे.

सध्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. पोलीस आता रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेबाबत महिला रुग्णालयाच्या सीएमओ डॉ इंदिरा सिंह यांनी सांगितले की, सीसीटीव्हीमध्ये एक महिला मुलाला घेऊन जाताना दिसत आहे. आता त्या आधारे पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल