उत्तर प्रदेशमध्ये लुटेरी दुल्हनने मोठा खेळ केला आहे. स्वत: एड्सबाधित होती आणि यानंतरही तिने लुटण्याच्या इराद्याने काही लोकांसोबत लग्न करत त्यांचा जीव धोक्यात घातला आहे. तिच्याशी शरीरसंबंध असलेले तीन लोकांनाही बाधा झाल्याचे समोर आले आहे.
लग्न करून सासरच्या लोकांना लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करायचे काही दिवस रहायचे आणि नंतर दागिने, पैसे घेऊन पोबारा करायचा. पुन्हा दुसरे सावज शोधायचे. असे प्रकार करणाऱ्या सध्या युपी, बिहारमध्ये कार्यरत आहेत. परंतू, यातीलच एक महिला एड्सबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे.
एक महिला लग्नाच्या नावावर फसवणूक आणि चोरीच्या टोळीत सहभागी होती. तिच्या नातेवाईकांसोबत मिळून ती इच्छुक वरासोबत लग्न करायची. काही दिवस त्याच्यासोबत रहायची, सुहागरात, हनिमून झाले की सर्व दागिने-पैसे घेऊन पोबारा करायची. पश्चिम युपीच्या एका जिल्ह्यात पोलिसांनी या टोळीला महिला व सात नातेवाईकांना पकडले. एचआयव्ही बाधितांच्या यादीत तिचे नाव पाहून डॉक्टरांसोबत पोलिसांचेही डोळे पांढरे होण्याची वेळ आली.
ही महिला आधीच एचआयव्ही पॉझिटीव्ह होती. आरोग्य विभागाच्या एका अभियानात तिची तपासणी झाली होती. अनेकदा तिला औषधे घेण्यासाठी समजाविण्यात आले होते. परंतू ती काही केल्या औषध घेत नव्हती. एचआयव्ही पॉझिटीव्ह असूनही औषधे घेत नसलेल्यांच्या यादीत तिचे नाव होते. तिचा शोध घेण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला असता ती तुरुंगात असल्याचे समजले आणि पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाची पळापळ सुरु झाली.
तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तिने पाच लग्ने केली आहेत. नवरदेवाला विश्वासात घेऊन, त्याच्यासोबत काही दिवस राहून ती पळून जात होती. पोलिसांनी या लोकांचे घर गाठत त्यांचीही एचआयव्ही टेस्ट केली आहे. यापैकी तिघांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.