रेल्वे स्टेशनवर नव्याने बसवण्यात येत असलेल्या एस्कलेटरवरून जाताना अनेकजण गोंधळतात, अडखळतात. मात्र आज आग्रा कँट रेल्वे स्टेशनवरील एस्कलेटरवर अभूतपूर्वी गोंधळ उडाला. एस्कलेटरवरून जाताना प्रवाशांच्या बॅग अडकल्या आणि बॅग अडकल्याने काही प्रवासी पायऱ्यांवर अडखळून पडले. मात्र यादरम्यान एस्कलेटर चालतच राहिला. काहीतरी अपघात घडलाय, या भीतीने प्रवाशांना आरडाओरडा सुरू केला. या दरम्यान, कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला. तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना महिनाभरापूर्वीची २ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारासची आहे. आग्रा कँट येथील रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर अचानग गडबड गोंधळ माजला. येथील एस्कलेटरवरून प्रवाशी एका प्लॅटफॉर्मवरून दुसरीकडे जात होते. तेवढ्यात काही प्रवाशांच्या बॅग पायऱ्यांमध्ये अडकल्या आणि काही प्रवासी पायऱ्यांवर पडले.
याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एस्कलेटरवरून प्रवासी चालत असल्याचे दिसत आहे. अचानक प्रवाशांची बॅग अडकते आणि ते ती खेचण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नामध्ये काही लोक पडतात. तसेच गोंधळाचं वातावरण तयार होतं. व्हिडीओमध्ये लोक आरडाओरड करत असल्याचे आवाजही ऐकू येतात. तर काही जण प्रवाशांना संयम बाळगण्याचं आवाहन करतात.
मात्र एस्कलेटरवर ही घटना घडण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप समोर आलेलं नाही. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांच्या मते एस्कलेटरवर प्रवाशांची गर्दी होती. अचानक लोक ओरडू लागले. काय झालं, कसं घडलं हे काही कळू शकलं नाही.