शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कष्टाचे फळ मिळालेच! झोपडीत राहणाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाची UPSC मध्ये बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 5:10 AM

पवनला हे यश त्याच्या तिसऱ्या प्रयत्नानंतर मिळाले.

लखनौ : झोपडीत राहणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा पवनकुमारने यूपीएससी परीक्षेत २३९वी रँक मिळवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पवनला हे यश त्याच्या तिसऱ्या प्रयत्नानंतर मिळाले. त्याचे झोपडीवजा घर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल, त्याच्या कुटुंबीयांना किती आनंद झाला असेल. कष्टाळू लोक, आपले भविष्य स्वत: घडवतात, यावर तुमचाही विश्वास बसेल. यूपीएससी नागरीसेवा परीक्षा २०२३ चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला आला, तर बुलंदशहरच्या पवनकुमारने या परीक्षेत २३९ वा क्रमांक पटकावला आहे. 

पवनचे कुटुंब राहते झोपडीत- बुलंदशहरच्या सायना तहसीलच्या रघुनाथपूर गावात पवनचे कुटुंब एका झोपडीत राहते. पवनच्या कुटुंबाकडे चार गुंठे शेतजमीनही आहे, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, अशी माहिती समोर आली आहे.- पवनला त्याच्या कुटुंबात चार भाऊ आणि बहिणी आहेत. अशा परिस्थितीत पवनसारखा तरुण लाखो उमेदवारांसाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. पवनच्या यशाबद्दल ऐकून सर्व जण त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करत आहेत.

स्वयंअध्ययनातून तिसऱ्या प्रयत्नात यशपवनने दिल्लीत राहून नागरीसेवा परीक्षेची तयारी केली होती. या कालावधीत त्याने स्वयंअध्ययनातून २३९वा क्रमांक पटकावला आहे. पवनला तिसऱ्या प्रयत्नानंतर हे यश मिळाले.

काय म्हणाले पवनचे कुटुंबीय?- पवनची बहीण गोल्डी म्हणाली की, ती तिच्या भावाचे यश शब्दात सांगू शकत नाही. - स्वअभ्यासामुळे त्याने हे यश संपादन केले आहे. पवनची आई सुमन यांनीही सांगितले की, त्या आपल्या मुलाच्या यशाने खूप आनंदी आहेत.

आयएएस अवनीश कुमार यांनी शेअर केला घराचा व्हिडीओ‘ट्वेल्थ फेल’ हा प्रसिद्ध चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या खऱ्याखुऱ्या जीवन कहानीवर आधारित चित्रपट आहे. त्यांनीही यूपीएससी परीक्षेत अथक कष्टांनंतर यश  मिळविले होते.त्यांच्याप्रमाणेच सध्या आएएएस असलेले अवनीश कुमार यांचीही कथा आहे. त्यांनी पवनकुमारच्या झोपडीवजा घराचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला. ‘पवन का घर. इन्होंने सिव्हिल सेवा परीक्षा में में २३९ वी रैंक पायी है. मेहनती लोग अपना भविष्य ख़ुद लिखते हैं,’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी