शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कलह... लग्नानंतर पती निघाला सफाई कर्मचारी, पत्नी बनली अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 6:07 PM

बरेलीतील एका जोडप्याच्या नात्याची सुरुवातच खोटारडेपणातून झाली होती.

बरेली - जिल्ह्यातील एका महिला पीसीएस अधिकाऱ्याच्या पतीने स्वत:च्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियातील चॅट शेअर करत पत्नी दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असून दोघं मिळून मला ठार करण्याचा डाव आखत असल्याचं पीडित पतीने म्हटलं आहे. याप्रकरणी होमगार्डचे डीजी बी. के. मौर्य यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कारण, पीडित पतीने आरोप केलेली व्यक्ती ही गाझियाबादमधील होमगार्डचे कमांडेंट आहे.

बरेलीतील एका जोडप्याच्या नात्याची सुरुवातच खोटारडेपणातून झाली होती. आता, या पती-पत्नीच्या नात्यात मोठी दरार पडली असून एकमेकांच्या जीवावर बेतेल इथपर्यंत हे सर्व पोहोचले आहे. प्रयागराज येथे सन २०१० मध्ये  सरकारी नोकरदार युवक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवतीचे लग्न झाले. त्यावेळी, दोन्ही कुटुंब आनंदी होते. सर्वकाही सुरळीत चाललं होतं. त्यात, २०१५ साली विवाहित तरुणी अधिकारी बनल्याने सर्वांनाच आनंद झाला. मात्र, हेच कारण या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यात मिठाचा खडा टाकणारं ठरलं. 

सध्या बरेली येथे पीसीएस ऑफिसर पदावर असलेल्या महिलेनं सांगितलं की, लग्नावेळी पतीने स्वत: ग्रामविकास अधिकारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, ते स्वच्छता कर्मचारी असल्याचं पुन्हा निष्पन्न झालं. तर, पत्नीचे गाझियाबादमधील एका आरोपीसोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे, दोघे मिळून माझी हत्या करू शकतात, असा गंभीर आरोप पतीने केला आहे. आरोप-प्रत्यारोपाचं हे प्रकरण लखनौपर्यंत पोहोचल्यानंतर याप्रकरणी शासकीय स्तरावरुन चौकशी सुरू झाली आहे. 

अविश्वास आणि धोका देऊन कुठलंही नातं टिकत नाही. लग्नाच्या ८ वर्षानंतर मला समजलं की माझा पती ग्रामविकास अधिकारी नसून सफाई कर्मचारी आहे. कुटुंब वाचावे आणि मुलांच्या भविष्याची काळजी असल्याने मी समजून घेतलं. पण, मानसिकदृष्ट्या त्रास असह्य झाला आहे. माझा व्हॉट्सअप चॅट पाहिलं जात होतं, ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यामुळे, त्रस्त होऊन मी एप्रिल महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं महिला अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. तसेच, घटस्फोट देण्यासाठी प्रयागराज येथील माझं घर आणि ५० लाख रुपयांची मागणी पतीकडून झाल्याचा आरोपही अधिकारी महिलेनं केला आहे. माझ्यासाठी कायदा हा सर्वश्रेष्ठ असून मी कायद्याच्या मदतीनेच या परिस्थितून बाहेर पडेल, असेही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न