शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 19:26 IST

Rahul Gandhi : आरक्षण, संविधान, ईडी, सीबीआय यावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

लखनौ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लखनौमध्ये राष्ट्रीय संविधान परिषदेला संबोधित केले. यावेळी आरक्षण, संविधान, ईडी, सीबीआय यावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. अशिक्षित राजा देखील व्यवस्थित काम करू शकतो, कारण तो लोकांचे ऐकतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा आहेत, ते लोकांचे काही ऐकत नाहीत. त्यांचे सर्व नेते आरक्षण संपवू असे सांगत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी म्हणतो की तुम्ही आरक्षण कधीच रद्द करू शकत नाही. ते (भाजप) संविधान, आरक्षण, लष्कर या सर्वांवर हल्ला करत आहेत… सत्य काय आहे... सत्य हे आहे की, मी जनतेचा आवाज आहे. पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. सर्वप्रथम भारताचे सामाजिक वास्तव देशासमोर मांडावे लागेल. कोणालाही दुखवू नका, कोणालाही धमकावू नका."

"जनतेच्या प्रत्येक घटकाला त्यांच्या सहभागाची माहिती द्यावी लागेल. सीबीआय आणि ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान काय झालं… मी ईडीच्या अधिकाऱ्याला सांगितलं की, तुम्ही मला इथे बोलावलं असेल, असा विचार करत असाल. तर हा तुमचा गैरसमज आहे. मी आलो आहे. मी का आलो हे तुला माहीत आहे. देशाच्या लोकशाहीची कोण हत्या करत आहेत, हे मला पहायचे आहे", असे राहुल गांधी म्हणाले.

"...म्हणून अदानी-अंबानींची आठवण काढत आहेत"भारताला महासत्ता बनवायचे आहे. ९० टक्के लोकांना सहभागी व्हावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, "संस्थांमध्ये आरएसएसचे लोक भरणे, न विचारता अग्निवीर योजना राबवणे, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करणे…हे संविधानाशी छेडछाड आहे. पंतप्रधान आता स्वत:ला वाचवण्यासाठी अदानी आणि अंबानींची आठवण काढत आहेत. पण ते वाचू शकणार नाहीत, हे सत्य आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी