काँग्रेस नेते तथा खासदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी (१७ फेब्रुवारी २०२४) उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये पोहचत आहे. मात्र, त्यांना प्रशासनाकडून पूर्वनियोजित ठिकाणी थांबण्याची परवानगी मिळालेली नाही. यामुळे आता ते मुंशी लाटपूर येथील एका शेतात थांबतील.
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार दुबे म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा १७ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यातील ज्ञानपूर हद्दीतील विभूती नारायण इंटर कॉलेजच्या मैदानावर थांबणार होती. मात्र, यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.
काय म्हणाले पोलीस? -यासंदर्भात माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक राजेश भारती म्हणाले, विभूती नारायण इंटर कॉलेज पोलीस भर्ती परीक्षेसाठी केंद्र असणार आहे. 17 आणि 18 फेब्रुवारीला तेथे दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहेत. यामुळे त्याच्या मैदानावर यात्रेस थांबण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
अशी आली काँग्रेसची प्रतिक्रिया -यावर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दुबे यांनी, जिल्हा प्रशासनावर अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत, पक्षाने प्रशासनाला विभूती नारायण इंटर कॉलेजमध्ये यात्रा थांबणार असल्याची माहिती एक आठवड्यापूर्वीक दिली होती. मात्र, असे असतानाही या महाविद्यालयाला परीक्षा केंद्र बनवण्यात आले. खरे तर, इतर महाविद्यालयांचाही पर्याय खुला होता.
दुबे म्हणाले, राहुल गांधी आणि त्यांचा ताफा आता मुन्शी लाटपूर येथील उदयचंद राय यांच्या शेतात रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबेल. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. मैदानात मुक्कामाची तयारी सुरू आहे.