शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 5:58 AM

२४ जानेेवारीपासून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे. 

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर उभारण्यात येत आहे. त्यातील भगवान रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या १४ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत आयोजिण्यात आला आहे. २४ जानेेवारीपासून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे. 

मकर संक्रांतीनंतर होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत अयोध्या येथील राममंदिर उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. १६१ फूट उंच असलेल्या या मंदिराच्या तळमजल्याचे काम आता पूर्ण झाले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येचे राममंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याचा तळमजला हा राम कथेसाठी राखून ठेवण्यात येईल. 

या मंदिराच्या तळमजल्यावर १६० कॉलम, पहिल्या मजल्यावर १३२ काॅलम, दुसऱ्या मजल्यावर ७४ कॉलम तसेच मंदिरात पाच मंडपही असणार आहेत. राममंदिराच्या बांधणीसाठी ४ लाख टन दगड व राजस्थानातील संगमरवराचा वापर केला जाणार आहे. या बांधकामात स्टील किंवा विटांचा वापर होणार नाही. (वृत्तसंस्था)

गर्भगृहाच्या दरवाजाला देणार सोन्याचा मुलामा- अयोध्या येथील भगवान राम यांच्या मंदिराला सागवानी लाकडाचे ४६ दरवाजे असणार आहेत. त्याच्या गर्भगृहाच्या दरवाजाला सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे. - राममंदिराची वास्तू हजाराहून अधिक वर्षे उत्तम स्थितीत उभी राहील, असा विचार करून ती बांधण्यात आली आहे. - एकूण ९ एकराच्या रामजन्मभूमीवर राममंदिराचे संकुल उभे राहत आहे. त्यातील तीन एकरावर भव्य राममंदिर उभारले जाईल, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने दिली.

- गाभाऱ्यात ५ वर्षीय बालक स्वरूपात रामलल्लाची माेहक मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. मूर्ती साडेआठ फूट उंच राहणार असून सूर्यकिरणे श्रीरामाच्या ललाटीला स्पर्श करतील, अशी गाभाऱ्याची रचना राहील.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या