शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
3
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
4
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, घसरणीसह सेन्सेक्स-निफ्टीची उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
5
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
6
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
7
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
8
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
9
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
10
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
11
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
12
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
13
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
14
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
15
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
16
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
17
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
18
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
19
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?

अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 4:27 PM

आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत.

प्रभू रामलला भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान झाल्यानंतर, अयोध्येला पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त होताना दिसत आहे. देश आणि जग भरातील राम भक्त प्रभू रामललांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. राम मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, रोज दीड ते दोन लाख लोक रामललांच्या दर्शनासाठी येत आहेत. सुट्टीच्या दिवसात तर हा आकडा आणखी वाढतो. याशिवाय, सनांच्या दिवशीही मंदिरात मोठी गर्दी दिसून येते. राम मंदिरासोबतच रामनगरी अयोध्याही जगाच्या नकाशावर उठून दिसत आहे.

आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत. गेल्या 2 महिन्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कुठल्याही धार्मिक स्थळी पोहोचलेले नाहीत.

ख्रिश्चन समाजाचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणजे, व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकनला दरवर्षी सुमारे 90 लाख लोक भेट देतात. तसेच मुस्लीम समाजाचे सर्वात मोठे पवित्रस्थळ म्हणजे मक्का. येथे गेल्या वर्षात 13.5 कोटी लोकांनी भेट दिली. राम मंदिरासंदर्भात बोलायचे झाल्यास, येथे रोज लाखो भाविक येत आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे एक कोटी लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे.

सव्वा कोटी भाविकांनी घेतलं दर्शन ट्रस्टचा दावा - राम मंदिर ट्रस्टचे कँप कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दावा केला आहे की, सरकारी आकडेवारीनुसार जवळपास एक कोटी 25 लाखहून अधिक राम भक्तांनी रामलला ललांचे दर्शन केले आहे. पूर्वी भारत विश्व गुरू होता. त्याची राजधानी अयोध्या होती. काहीसे असेच पुन्हा एकदा होत आहे. हिंदू समाजाच्या दृष्टीने ही फारच चांगली गोष्ट आहे. एवढेच नाही, त भारतासाठी याहून चांगली गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही, असेही प्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे. 

गुप्ता म्हणाले, मक्का मदीनेत केवळ हजच्या वेळीच लोक जातात. तसेच, ख्रिश्चन धार्मिक स्थळालाही विशिष्ट काळातच लोक भेट देतात. अयोध्येत रोज जवळपास 2 लाख लोक येत आहेत. राम जन्मोत्सवादरम्यान ही संख्या 5 ते 10 लाख पर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश