पब्जी खेळताना नोएडातील सचिन मीणाच्या प्रेमात पडून बेकायदेशीरपणे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर सतत चर्चेत आहे. आता, भारत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, सीमाने रविवारी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत नोएडातील घरावर तिरंगा फडकावला.
यावेळी सीमाने पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या. याप्रसंगी बॉलिवूड सिनेमाची ऑफर नाकारल्याचेही सीमा आणि वकील सिंह यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवर, पाकिस्तानी नागरिकाला (सीमा हैदर) चित्रपटात घेतल्यास मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा इशारा दिल्यानंतर सीमाने चित्रपट नाकारल्याचे सांगितले. दरम्यान, सीमाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सीमा आणि तिच्या मुलांसह सचिनचे कुटुंबीय व त्यांचे वकील एपी सिंह तिरंगा फडकावताना दिसतात.