शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

सीमा हैदर आणि सचिनची तब्येत बिघडली, स्थानिक डॉक्टरांकडून उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:48 AM

सीमा आणि सचिनच्या प्रकृतीबाबत सचिनच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर आणि सचिन मीना, ही दोन नावे भरपूर चर्चेत आहेत. PUBG गेमद्वारे दोघे प्रेमात पडले आणि भारतीय सचिनसाठी पाकिस्तानी सीमा आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. सध्या ती सचिनसोबत ग्रेटर नोएडात राहत आहे. मात्र, यादरम्यान सोशल मीडियावर काही लोकांनी सीमा हिच्यावर ती पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा आरोप केला. तर काही लोकांनी सीमाला पाकिस्तानच्या स्लिपर सेलची सदस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएसने सीमाची तब्बल १८ तास चौकशी केली. 

दरम्यान, सीमा आणि सचिन यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. दोघांनाही घरीच ग्लुकोज दिले जात आहे. सीमा आणि सचिन या दोघांनीही अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी याबाबत स्थानिक डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्याचे पाहून डॉक्टरांनी ग्लुकोज देण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सीमा आणि सचिनच्या प्रकृतीबाबत सचिनच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

"पाकिस्तानची गुप्तहेर नाही""मी स्वतःबद्दल खोटे बोलत नाही. मी पाकिस्तानची गुप्तहेर नाही. सोशल मीडियावर माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत, ज्या पूर्णपणे निराधार आहेत", असे उत्तर प्रदेश एटीएसने केलेल्या चौकशीनंतर सीमा हैदरने एका वृत्तवाहिनीला सांगितले. याचबरोबर, भारतीय लष्कराशी संबंधित लोकांशी संपर्क साधण्याच्या प्रश्नावर सीमाने सांगितले होते की, तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कधीही कोणत्याही भारतीयाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही किंवा भारतीय लष्कराशी संबंधित लोकांशीही संपर्क साधला नाही.

"अलीकडेच अकाउंट पब्लिक केले"सीमाच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे पाच अकाउंट होते. यातील दोन अकाउंट तिच्या मुलाची होती. मात्र, ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. सोशल मीडियावर तिचे काही मित्रही होते. तिने आपले अकाउंट प्रायव्हेट ठेवले होते, याचा अर्थ तिच्या वतीने केलेल्या पोस्ट कोणीही पाहू शकत नाही. तसेच, सीमाने सांगितले की, अलीकडेच तिने आपले अकाउंट पब्लिक केले आहे, तेव्हापासून तिला हजारो फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश