Seema Haider Sachin Meena : पबजीवरुन ओळख आणि नंतर प्रियकराला भेटण्यासाठी अवैधरित्या नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्यात येणार आहे. यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाईदेखील सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की, सीमा हैदरची सध्या चौकशी सुरू आहे. सर्व एजन्सी आपापले काम करत आहेत. ही बाब दोन देशांशी संबंधित आहे. पुरावे मिळेपर्यंत काहीही बोलणे योग्य नाही.
सीमेबाबत नवनवीन खुलासे
सचिन मीनाच्या प्रेमात पडल्यानंतर सीमा हैदर भारतात आली आणि सचिनसोबतच उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहू लागली. अलीकडेच यूपी एटीएसने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चौकशीत सीमाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच तिला परत पाठवण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.
यापूर्वी सीमा हैदरबाबत तपास यंत्रणांना मोठे पुरावे मिळाले आहेत. सीमाला भारतात येण्यासाठी तिसर्याने मदत केली आहे. सुरक्षा यंत्रणांची नजर टाळण्यासाठी तिने आपल्या मुलांचा वापर केला. याशिवाय तिला नेपाळमध्ये उपस्थित असलेल्या पाकिस्तानी हस्तकांकडून प्रशिक्षण मिळाल्याचीही माहिती आहे. आता भारतीय गुप्तचर आणि तपास यंत्रणा योग्य तो तपास करत आहेत.