रायबरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात एका मुस्लीम व्यक्तीने पत्नीला तीन तलाक दिला. पत्नी शहनाज ही भगवान श्रीकृष्णाची भक्ती करताना पाहिल्यानंतर पतीला राग अनावर झाला आणि त्याने तीन तलाक देत पत्नीला स्वत:पासून वेगळे केले. पतीसोबत झालेल्या वादानंतर सैहनाज आई-वडिलांच्या घरी आली. मात्र, आई-वडिल व माहेरच्यांनीही तिला बोलणे सुनावले. त्यामुळे, शहनाजला काय करावे हेच कळेना. त्यावेळी, शहनाजने आपल्या बालपणीचा मित्र पवनला आपले दु:ख सांगितले.
पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली, दोघांनी एकमेकांचं दु:ख एकमेकांना सांगितल. तर, पवनने शहनाजला आधार दिला, पुढे दोघांनी एक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, दोघांनी आश्रमात जाऊन लग्न केलं. शहनाजने आई-वडिलांचा घर सोडून अगस्त्य मुनि आश्रमात जाऊन पवनसोबत हिंदू-रिती-रिवाजानुसार लग्न केले.
शहनाजने लग्नानंतर आपलं नाव बदललं असून ती आता आरोही बनली आहे. शहनाज आणि पवनकुमार हे फरीदपूरच्या ढाकनी गावातील रहिवाशी आहेत. पवन आणि शहनाज हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे, लहानपणापासूनच शहनाज भगवान श्रीकृष्ण यांची भक्त होती. ती त्यांची पूजा करत. तिच्या कुटुंबीयांना अनेकदा तिला रोखले, तरीही ती भगवान श्रीकृष्णाची पूजा करत.
दरम्यान, २०१८ मध्ये शहनाजचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यातच पतीसोबत श्रीकृष्ण भक्तीवरुन भांडण झाले. त्यावेळी, पतीने तिला तीन तलाक दिला. त्यानंतर, शहनाजला तिच्या आई-वडिलांनीही टोचून बोलणे केले, त्यामुळे तिने आधार म्हणून पवनला आपला जीवनसाथी निवडले.