शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

एक्झिट पोलद्वारे भाजपला शेअर बाजारात नफा मिळवायचाय, सपा नेते अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 7:21 AM

सतर्क राहून मतमोजणीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन

लखनौ : भाजपधार्जिनी माध्यमे भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा दाखवतील, यामुळे फसवणुकीला वाव मिळेल, असे विरोधकांनी आधीच जाहीर केले होते. भाजपचा एक्झिट पोल अनेक महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, तो सध्या वाहिन्यांनी चालविला होता. या एक्झिट पोलद्वारे जनमताची फसवणूक केली जात आहे, असा आरोप सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. ⁠या एक्झिट पोलच्या आधारे, भाजपला सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर तत्काळ नफा मिळवायचा आहे. जर हे एक्झिट पोल खोटे नसते आणि भाजपचा खरोखर पराभव होत नसता तर भाजपच्या लोकांनी आपल्याच लोकांना दोष दिला नसता. भाजपचे कोमेजलेले चेहरे संपूर्ण सत्य सांगत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

एक टक्काही चूक करू नकाइंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांनी ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यात एक टक्काही चूक करू नये. इंडिया आघाडी जिंकत आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी खूप सतर्क राहावे लागणार आहे. मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयाचे प्रमाणपत्र मिळाल्यावरच विजयाचा गुलाल उधळा, असे आवाहन अखिलेश यांनी केले आहे.

न्यायालयामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हेराफेरीचे धाडस होईनाअखिलेश म्हणाले की, चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीप्रमाणे संपूर्ण देशाचा निकाल बदलता येणार नाही हे भाजपला समजत आहे. यावेळी विरोधक पूर्णपणे सतर्क आहेत आणि जनक्षोभही शिगेला पोहोचला आहे. भाजपशी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची कारवाई पाहून हेराफेरी करण्याचे धाडसही होत नाहीये. जनतेच्या रोषाला बळी पडण्याची त्यांची इच्छा नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४