Banda Hanuman Mandir: भारतात अनेक प्रकारच्या घटना घडताना दिसतात. देशात हजारो मंदिरे आहेत. या मंदिरातून विचित्र घटना घडत असल्याचा दावा भाविकांकडून केला जात असतो. यातच आता बांदा येथील एका हनुमान मंदिरात थेट हनुमंतांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या मंदिरातील पुजाऱ्यांनी विशेष पूजा करून भाविकांसह रामनामाचा जप केल्यानंतर हे अश्रू येणे बंद झाले, असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदा भागात एका प्राचीन मंदिरात ठेवलेल्या हनुमानजींच्या मूर्तीतून अश्रू बाहेर पडत असल्याची वार्ता संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या मंदिरात भाविकांची गर्दी झाली. भाविकांनी जय श्री रामचा जयघोष सुरू केला. हनुमान मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागल्यानंतर पुजारी, स्थानिकांनी बजरंगबलीची क्षमायाचना केली. यासंदर्भातील एक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे.
हनुमंतांच्या मूर्तीतून अश्रू अन् बघ्यांची मोठी गर्दी
उत्तर प्रदेशातील बांदा येथील फतेजगंजमधील घनदाट जंगलात हनुमानजीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर स्थानिकांचे आणि भाविकांचे श्रद्धेचे केंद्र आहे. रविवारी सायंकाळी काही भाविकांना बजरंगबलीच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येताना दिसले आणि त्यांना धक्काच बसला. ही माहिती पसरताच बघ्यांची गर्दी झाली. स्थानिक लोकांनी सांगितले की, आधी एक डोळ्यातून मग दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यामुळे भाविक आणि स्थानिक आश्चर्यचकित झाले. एका भक्ताने व्हिडिओ बनवून व्हायरल केला. स्थानिक लोक तेव्हापासून रामनामाचा जप करत आहेत.
दरम्यान, ही मूर्ती प्राचीन काळातील आहे. स्थानिक लोक असेही म्हणतात की, कोणतीतरी अप्रिय घटना घडणार असून, ते दूर करण्यासाठी किंवा त्याचा संकेत म्हणून हनुमानच्या डोळ्यातून अश्रू आले असावेत. भगवंताची लीला फक्त त्यांनाच माहिती असून, या मंदिरात विशेष पूजा केली जात आहे. मंदिराचे पुजारी रामबाबू महाराज यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही पूजा करण्यासाठी आलो तेव्हा डोळ्यातून पाणी येत होते, काही वेळाने मला दिसले की ते सुरूच होते. या भागात कोणतेतरी मोठे संकट येणार असावे. सध्या विशेष पूजेनंतर अश्रू येणे थांबले आहे, असे ते म्हणाले.