लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये राममंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि थेट अयोध्येकरिता विमान सेवा सुरू झाल्यामुळे भाविकांचा, तसेच पर्यटकांचा अयोध्येकडील ओढा वाढला असून, यामुळे तेथील विमान तिकिटांनी एकेरी मार्गासाठी २० हजारांचा दर गाठला आहे. मुंबई ते अयोध्या या एकेरी मार्गावरील दर हे अनेक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या पुढे गेले आहेत.
(किंमत रुपयांमध्ये)
येत्या १९ जानेवारीपासून मुंबई ते अयोध्या (महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ) अशी विमान सेवा इंडिगो कंपनीतर्फे सुरू होणार आहे. या विमानाच्या तिकिटाचे दर २० हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत.