रामेश्वर : विविध भाषा, प्रांत, संस्कृतीने युक्त असलेल्या भारताला एकाच सूत्रात बांधण्याचे कार्य अत्यंत प्राचीन काळापासून बारा ज्योतिर्लिंगांच्या माध्यमातून होत आहे, असे विचार काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी व्यक्त केले.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, रामेश्वर ही रामाची तपोभूमी आहे. अशा पुण्यभूमीमध्ये काशी जगद्गुरू मठ व यात्री निवास होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमास कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा, जमखंडीचे आमदार जगदीश गुडगुंठीमठ, बागलकोट येथील श्री बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संघाचे चेअरमन वीरण्णा चरंतीमठ हे प्रमुख मान्यवर तसेच हजारो भक्तगण उपस्थित होते.
रामेश्वर क्षेत्रामध्ये काशीपीठाची शाखामठ आणि यात्री निवासाच्या भूमिपूजनप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व मान्यवर.