शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

मजुराच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटी रुपये, आयकर विभागाची नोटीस पाहून बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 6:22 PM

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील मजूर रातोरात अब्जाधीश झाला, पण यामुळे तो अडचणीत आला.

बस्ती: उत्तर प्रदेशच्या बस्तीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मजूर रातोरात कोट्यधीश झाला. त्याच्या खात्यात अचानक 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रक्कम आली. बँक खात्यात एवढी रक्कम पाहून त्या मजुराचे डोळे दिपले. मात्र आता ही रक्कम त्याच्यासाठी मोठी अडचणी बनली आहे. आयकर विभागाने त्या व्यक्तीला नोटीस बजावली आहे.

हे प्रकरण बस्तीच्या लालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बटानिया गावचे आहे. शिवप्रसाद निषाद यांच्या घरी प्राप्तिकर विभागाची नोटीस पोहोचताच खळबळ उडाली. शिवप्रसाद दिल्लीत दगड फोडण्याचे काम करतो. एका मजुराच्या घरी आयकर विभागाची नोटीस पोहोचल्याने कुटुंबाला धक्का बसला. नोटीसमध्ये शिवप्रसाद यांच्या बँक खात्यातून 221 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. तसेच, 20 ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

2019 मध्ये पॅन कार्ड हरवले शिवप्रसाद यांच्या खात्यात एवढे पैसे कसे आले, हे अद्याप समजू शकले नाही. शिवप्रसाद काम सोडून दिल्लीहून यूपीला परतला आहे. दरम्यान, शिवप्रसादने 2019 मध्ये त्याचे पॅनकार्ड हरवल्याची माहिती दिली. त्याच्या पॅनकार्डच्या मदतीने कुणीतरी हे पैसे खात्यात टाकल्याचा अंदाज आहे. 

शिवप्रसादची पोलिसात धावया संदर्भात शिवप्रसादने लालगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. खात्याचा तपशील काढल्यानंतर या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. शिवप्रसाद आयकर विभाग गाठून आयकर अधिकाऱ्यांना भेटण्याचाही प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIncome Taxइन्कम टॅक्सPoliceपोलिस