उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. योगी सरकारने ७ लाख ३६ हजार ४३७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातून विविध घोषणा केल्या आहेत. यूपी सरकारने या बजेटमध्ये अनेक मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. याशिवाय धार्मिक महत्त्व असलेल्या शहरांनाही मोठ्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रयागराज, अयोध्या, मथुरा आणि बनारसचा (वाराणसी) समावेश आहे.
अयोध्येसाठी १५० कोटी रूपयांची तरतूदअलीकडेच अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी बजेटमध्ये १५० कोटी रुपयांची तरतूद आहे. अयोध्येत 'महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम'चा विकास करण्यात आला आहे. अयोध्येतील विमानतळाच्या उभारणी आणि विस्तारासाठी १५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. तसेच अयोध्येला मॉडेल सोलर सिटी म्हणून विकसित केले जात आहे. अयोध्येच्या सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद आहे.
प्रयागराज
- प्रयागराज अर्थात पूर्वीचे इल्हाहाबाद जिल्ह्यात गंगा एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी २०५७ कोटी ७६ लाख रुपयांची घोषणा करण्यात आली.
- जागतिक दर्जाच्या सुविधांसह महाकुंभमेळा २०२५ चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी २५०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.
- वाराणसीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी योगी सरकारने ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- वाराणसी शहराला मॉडेल सोलर सिटी म्हणून विकसित केले जात आहे.
- वाराणसी आणि इतर शहरांमध्ये रोपवे सेवा विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.
- वाराणसी जिल्ह्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (NIFT) स्थापनेसाठी जमीन खरेदीसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद आहे.
मथुरामथुरा जिल्ह्यात ३० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या नवीन डेअरी प्लांटच्या उभारणीसाठी (प्रतिदिन एक लाख लिटरपर्यंत विस्तार) करण्यासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.