समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचं योगी सरकार अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी रोखठोकपणे 13 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत, तसेच त्यांनी भाजपावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"यूपीचे बजेट 7 लाख कोटी रुपयांचे असो की 8 लाख कोटी रुपयांचे… 90% लोकांसाठी म्हणजे PDAसाठी त्यात काय आहे, हा प्रश्न आहे. वास्तविक, भाजपाचे धोरण सर्वसामान्य लोकांच्याविरोधात आहे, ते 10% श्रीमंत लोकांसाठी 90% बजेट ठेवतात आणि 90% गरजू लोकांसाठी फक्त नाममात्र 10% बजेट ठेवतात. उत्तर प्रदेशच्या भाजपा सरकारने आकड्यांमध्ये अडकवू नये, साधी गोष्ट सांगावी की,
- हा अर्थसंकल्प महागाईपासून किती दिलासा देणार?- किती तरुणांना रोजगार मिळेल?- गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार कमी करण्याच्या उपाययोजनांवर प्रत्यक्षात किती खर्च केला जाईल?- मंदी आणि जीएसटीचा फटका बसलेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत?
- शेतकऱ्यांच्या पोत्यांची चोरी थांबणार की नाही, पिकांना योग्य भाव आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार की नाही?- मजुराला त्याच्या मेहनतीला योग्य भाव मिळेल की नाही?- महिलांना निर्भयपणे घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवले जातील का?- कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळेल की नाही- चांगले औषध, अभ्यासासाठी किती तरतूद आहे?- घरामध्ये पाणी आणि शौचालय सुरळीत चालवणं या योजनेसाठी किती तरतूद आहे?- पावसाळ्यात गोरखपूरच्या लोकांना बोट चालवण्याचे आणि पोहण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी गोरखपूरमध्ये किती तरतूद करण्यात आली आहे?- नवीन वीज प्रकल्पांचे बजेट किती आहे?- नवीन रस्ते तर सोडा, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी बजेटमध्ये काही तरतूद आहे की नाही ते सांगा...???
लोकांसमोर खोट्या दाव्यांचा प्रचार करण्यासाठी तुमच्या भाजपा सरकारने किती तरतूद केली आहे याची एक वेगळी मोठी फाईल कृपया जनतेसमोर ठेवा" असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.