शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 6:05 PM

हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे.  समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत कुठलीही चर्चा ...

हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे.  समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत कुठलीही चर्चा न करता पोटनिवडणुकीसाठी आपल्या 6 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. करहल विधानसभा मतदारसंघाव्यतिरिक्त सपाने सिसिमाऊ, फुलपूर, मिल्कीपूर, कटहारी आणि माझंवा येथून उमेदवार घोषित केले आहेत. हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशात सपाने जागावाटपासंदर्भात आक्रमक दिसत असलेल्या काँग्रेसला झटका देण्यास सुरुवात केली असून आघाडीसंदर्भात कसलीही चर्चा न करताच उमेदवारही जाहीर केले आहे.

कोणत्या जागेवर कुणाला दिली उमेदवारी? -पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने 6 नावांची घोषणा केली आहे. करहल विधानसभा मतदारसंघातून पक्षाने तेज प्रताप यादव यांना उमेदवारी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीवेळीही तेज प्रताप यादव यांना कन्नौज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र सपा कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर अखिलेश यादव यांनी स्वत: कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामुळे करहल विधानसभेची जागा रिकामी झाली होती. याशिवाय सपाने सिसीमऊ येथून नसीम सोलंकी, फुलपूरमधून मुस्तफा सिद्दीकी, मिल्कीपूरमधून अजित प्रसाद, काटेहरीमधून शोभवी वर्मा आणि मझवांमधून ज्योती बिंद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

या जागांवर होणार पोटनिवडणूक -1. खैर, अलीगड2. मिल्कीपूर, अयोध्या3. कटेहरी, अंबेडकरनगर4. मीरापूर, मुझफ्फरनगर5. सीसामऊ, कानपूर6. फूलपूर, प्रयागराज7. गाझियाबाद8. मझवां, मिर्झापूर9. कुंदरकी, मुरादाबाद10. करहल, मैनपुरी

अखिलेश-राहुल मैत्री तुटण्याच्या मार्गावर? -लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढलेल्या समाजवादी आणि काँग्रेसमध्ये पोटनिवडणुकीसंदर्भात कोणतीही सहमती होताना दिसत नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, बदललेल्या समीकरणामुळे सपा आता काँग्रेसला केवळ एकच जागा देण्याचा विचार करत आहे. आघाडीसंदर्भात समाजवादी पक्ष आता फ्रंटफूटवर असून काँग्रेसला केवळ फुलपूर जागेचाच प्रस्ताव देऊ शकते. यानंतर, उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची मैत्री तुटण्याच्या मार्गावर तर पोहोचली नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवPoliticsराजकारण