22 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून कांवड यात्रेला सुरुवात होईल आणि कांवड यांत्री हरिद्वारला रवाना होतील. मात्र या यात्रेपूर्वी यूपी पोलिसांच्या एका आदेशाने वादाला तोंड फुटले आहे. योगी सरकारने कांवड मार्गावरील दुकानदारांसाठी एक आदेश जारी केला आहे. या आदेशात, सर्व दुकाने आणि हातगाड्यांवर आपली नावे लिहावीत, जेणेकरून कोणत्या दुकानातून सामान खरेदी करत आहोत? हे कांवड यात्रेकरूंना समजेल, असे म्हणण्यात आले आहे.
वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कांवड यात्रेकरूंसाठी पावले उचलली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की, संपूर्ण उत्तर प्रदेशात कांवड मार्गावर खाद्यपदार्थांच्या दुकानांवर 'नेमप्लेट' लावावी लागेल. त्यावर दुकान मालकाचे आणि ते चालवणाऱ्याचे नाव तथा ओळख लिहावी लागेल. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कांवड यात्रेकरूंच्या आस्थेची शुद्धता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही, तर हलाल सर्टिफिकेशनची उत्पादने विकणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
...म्हणून घेण्यात आला निर्णय -पोलिसांच्या एका आदेशाने मुझफ्फरनगरच्या बाजाराचे चित्र बदलले आहे. या आदेशात पोलिसांनी म्हटले आहे, 'श्रावणाच्या पवित्र महिन्यात बरेच लोक, विशेषत: कंवड यात्रेकरू आपल्या आहारात काही खाद्यपदार्थ टाळतात. यापूर्वी अशा काही घटना समोर आल्या आरेत, ज्यांत खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या काही दुकानदारांनी आपल्या दुकांनांची नावे अशी ठेवली की, यात्रेकरूंमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही निर्माण झाली. याला आळा बसावा यासाठी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून कांवड मार्गावरील हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्वेच्छेने आपल्या मालकाचे आणि तेथे काम करणाऱ्याचे नाव प्रदर्शित करावे.'
मुजफ्फरनगरच्या बाजारातील चित्र बदलले - भाविकांची सुविधा आणि कायदा तथा सुव्यवस्था कायम राहावी असा यामागील उद्श असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आदेशानंतर, मुजफ्फरनगरातील दुकाने, हॉटेल आणि हातगाड्यांवर नेमप्लेट लावण्यात आल्या आहेत. तसेच कांवड यात्रेकरूंच्या भावनां दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी हा आदेश जारी करण्यात आला असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.