टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा संघही द. आफ्रिकेचा पराभव करुन फायनलला पोहोचला. त्यामुळे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तगडी लढत विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा धुरंदर गोलंदाज मोहम्मद शमीने ७ विकेट घेत धुव्वादार कामगिरी केली. त्यामुळे, जगभरातून त्याच्या गोलंदाजीचं कौतुक झालं. तर, शमी फायनल म्हणत भारतीयांनाही त्याची पाठ थोपाटली. आता, युपी सरकारकडून शमीच्या या खेळीबद्दल त्याच्या गावाला मोठं गिफ्ट मिळणार आहे.
मोहम्मद शमीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अफलातून गोलंदाजी केली. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यात ७ गडी बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे, सर्वत्र त्याचं कौतुक होत असून त्याच्या गावकऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आता, युपी सरकारकडू त्याच्या गावाला मोठं गिफ्ट मिळणार आहे. कारण, शमीच्या मूळ गावी मिनी स्टेडियम आणि ओपन जीम बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अमरोहा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश त्यागी यांनी यासंदर्भात माहिती दिली. मोहम्मद शमीचं मूळ गाव असलेल्या साहसपूर-अलीनगरमध्ये मिनी स्टेडियम आणि ओपन जीम बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचं त्यांगी यांनी सांगितलं. त्यामुळे, शमीच्या खेळीमुले प्रभावित होऊ युपी सरकारने त्याच्या गावाला हे गिफ्टच दिलंय, असंच म्हणता येईल.
मोहम्मद शमीने यंदाच्या विश्वचषकातील गोलंदाजीतून देशवासीयांची मने जिंकली आहेत. आपल्या तुफानी गोलंदाजीने त्याने सर्वच देशांच्या फंलदाजांची दाणादाण उडवून दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तब्बल ७ विकेट्स घेऊन त्याने भारताचा विजय निश्चित केला. त्यामुळेच, उपांत्य सामन्यात शमीला मॅन ऑफ द मॅचचा किताबही देण्यात आला.