UPमधील या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्याने गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश काय करणार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 09:35 PM2024-10-24T21:35:10+5:302024-10-24T21:35:30+5:30

Uttar Pradesh Assembly Bypolls : उत्तर प्रदेशमधील फूलपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये इंडिया आघाडीदरम्यान, मतभेद दिसून येत आहेत.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

Uttar Pradesh Assembly Bypolls : Congress leader secretly filed nomination form from this constituency in UP, what will Akhilesh do?   | UPमधील या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्याने गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश काय करणार?  

UPमधील या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्याने गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश काय करणार?  

उत्तर प्रदेशमधील फूलपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये इंडिया आघाडीदरम्यान, मतभेद दिसून येत आहेत.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी काँग्रेसचा एकही स्थानिक नेता उपस्थित नव्हता. फूलपूर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे मोहम्मद मुजतबा सिद्धिकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या परिस्थितीत काँग्रेसच्या सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने इंडिया आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र सुरेश यादव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 
 
फूलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या दावेदारीची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या मतदारसंघात काँग्रेसची स्थिती चांगली असल्याचं आणि ही जागा आपण जिंकू शकतो, असा दावा काँग्रेसचे काही नेते करत होते. मात्र समाजवादी पक्षाने येथे मोहम्मद मुजतबा सिद्धिकी यांना उमेदवार घोषित करून काँग्रेसच्या अपेक्षांवर पाणी फिरवले होते. त्यात आता सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीमधील तणाव वाढला आहे.
दरम्यान, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सर्व ठिकाणी समाजवादी पक्षच आपले उमेदवार उभे करेल, असं निश्चित झालं आहे.  

Web Title: Uttar Pradesh Assembly Bypolls : Congress leader secretly filed nomination form from this constituency in UP, what will Akhilesh do?  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.