या जागा जिंकणाऱ्याचेच सिंहासन, गेल्या पाच निवडणुकांमध्ये दिसले चित्र, राष्ट्रीय पक्षांचा या मतदारसंघांवर फाेकस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:13 AM2024-04-04T11:13:06+5:302024-04-04T11:13:51+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात लाेकसभेच्या ८० जागा आहेत. म्हणून प्रमुख राष्ट्रीय पक्ष उत्तर प्रदेशात शक्ती पणाला लावतात. मात्र, याच राज्यात असेही समीकरण आहे की, आरक्षित जागा ज्या पक्षाने जास्त जिंकल्या, त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले, असे चित्र गेल्या काही लाेकसभा निवडणुकीतून दिसले आहे.
- राजेंद्र कुमार
लखनाै - उत्तर प्रदेशात लाेकसभेच्या ८० जागा आहेत. म्हणून प्रमुख राष्ट्रीय पक्ष उत्तर प्रदेशात शक्ती पणाला लावतात. मात्र, याच राज्यात असेही समीकरण आहे की, आरक्षित जागा ज्या पक्षाने जास्त जिंकल्या, त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले, असे चित्र गेल्या काही लाेकसभा निवडणुकीतून दिसले आहे.
गेल्या दाेन निवडणुकांमध्ये भाजपने त्यात यश मिळविले. मात्र, त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सपा आणि बसपाने जास्त जागा जिंकल्या हाेत्या. त्यावेळी युपीएचे सरकार स्थापन झाले हाेते.उत्तराखंड राज्य निर्मितीपूर्वी १८ जागा आरक्षित हाेत्या. त्यानंतर एक जागा कमी झाली.
काेणत्या जागा आहेत आरक्षित?
नगीना, बुलंदशहर, हाथरस, शाहजहांपूर, हरदाेई, इटावा, बाराबांकी, मिश्रिख, माेहनलालगंज, जालाैन, काैशांबी, बहराईच, बांसगाव, लालगंज, मछलीशहर आणि राॅबर्ट्सगंज.
गेल्या निवडणुकीत बसपने लालगंज आणि नगीना या जागा जिंकल्या हाेत्या. तर अपना दल (एस) या पक्षाने एका जागेवर विजय मिळविला हाेता.