Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 02:20 PM2024-06-04T14:20:21+5:302024-06-04T14:20:52+5:30

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 : संपूर्ण राज्यात राम मंदिराची जबरदस्त चर्चाही सुरू होती. मात्र असे असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र राम मंदिराचा मुद्दा भाजपसाठी फायद्याचा ठरला नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला, उत्तर प्रदेशात यावेळी सपा आणि काँग्रेस एकत्रित लढले होते. यांची ही 'हात'मिळवणी फळाला येताना दिसत आहे.

Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 BJP's big loss in UP Congress-SP in profit | Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!

Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल येत आहे. यात उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे याच वर्षातच राम मंदिराचेही उद्घाटन झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामललांची प्राणप्रतिष्ठा केली होती. संपूर्ण राज्यात राम मंदिराची जबरदस्त चर्चाही सुरू होती. मात्र असे असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र राम मंदिराचा मुद्दा भाजपसाठी फायद्याचा ठरला नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला, उत्तर प्रदेशात यावेळी सपा आणि काँग्रेस एकत्रित लढले होते. यांची ही 'हात'मिळवणी फळाला येताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे सर्वात महत्वाचे राज्य आहे. येथे लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. आतापर्यंत आलेल्या येथील निकालात भाजप केवळ ३२ जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर समाजवादी पार्टी (सपा) ३७ जागांवर आघाडीवर दिसत आहे, काँग्रेस ८ जागांवर, आरएलडी २ जागांवर तर ASPKR १ जागेवर आघाडीवर दिसत आहे. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ७१ तर २०१९ मध्ये ६२ जागा मिळाल्या होत्या. तर उरलेल्या जागांवर सपा, काँग्रेस आणि इतरांना समाधान मानावे लागले होते.

भाजपने गेल्या २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवली होती. यानंतर आता या निवडणुकीत भाजपने ४००+ चा नारा दिला होता आणि सर्वच्या सर्व एक्झिट पोल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बाजूने आले होते. मात्र येत असलेल्या निकालात भाजपचा ४००+ चा नारा आणि सर्वच्या सर्व एक्झिट पोल जोरदार आपटताना दिसत आहेत. एनडीए सत्तेपर्यंत पोहचताना दिसत असला, तरी या निवडणुकीत त्यांना जबरदस्त फटका बसल्याचेही दिसत आहे आणि I.N.D.I.A. ने येथे मोठी मुसंडी मारली आहे. 


 
 

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 BJP's big loss in UP Congress-SP in profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.