शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

हृदयद्रावक! शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी गेले अन् एकाच कुटुंबातील चौघे दगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 8:28 AM

५ जण शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी टाकीतील विषारी वायूमुळे चौघेही चक्कर येऊन पडले.

कुशीनगर - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या ४ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत १ जण जखमीही आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. नेबुआ नौरंगियातील बहोरा रामपूर येथील ही घटना आहे. ज्याठिकाणी नंद कुशवाहा कुटुंबातील नितेश, आनंद, दिनेश आणि राजकुमार यांचा मृत्यू झाला आहे. 

हे ५ जण शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी टाकीतील विषारी वायूमुळे चौघेही चक्कर येऊन पडले. बेशुद्ध अवस्थेत ५ जणांना उपचारासाठी कोटवा येथील सीएचसी रुग्णालयात आणले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर अन्य तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु जिल्हा रुग्णालयात जाताना अन्य २ जण दगावले. याप्रकारे या घटनेत एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

गावकऱ्यांचा आरोप  दरम्यान, या प्रकरणानंतर गावकऱ्यांनी आरोप केलाय की, रुग्णवाहिका वेळेवर पोहचली नाही अन्यथा आणखी जीव वाचले असते. घटनेनंतर जिल्हाधिकारी रमेश रंजन आणि पोलीस अधीक्षक धवल जायस्वाल घटनास्थळी पोहचले तिथे मृतांच्या कुटुंबाशी संवाद साधला. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई देणार असल्याची घोषणा करण्यात आली. 

एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला. यापुढे टाकी साफ करण्यासाठी प्रोफेशनला बोलवणार, स्वत: साफ करण्याच्या नादात जीव जाण्याची भीती गावकऱ्यांना बसली आहे. अत्याधुनिक पद्धतीने टाकी साफ केली जाऊ शकते असं गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.