"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:41 PM2024-05-17T15:41:59+5:302024-05-17T15:42:50+5:30
मोदी म्हणाले, ''चार जून फार दूर नाही. मोदी सरकारची 'हॅट्रिक' होत असल्याचे आज संपूर्ण देश आणि जगालाही माहीत आहे. नव्या सरकारमध्ये मला गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप सारे मोठे निर्णय घ्यायचे आहे. यामुळे मी बाराबंकी आणि मोहनलालगंजमधील लोकांना आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.''
जर I.N.D.I.A. ची सत्ता आली, तर ते अयोध्येतील राम मंदिरावर बुलडोझर चालवतील. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर बुलडोझर कुठे चालवायला हवा? यासंदर्भात या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्यूशन घ्यावी, असा सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. ते उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये आयोजित एका प्रचारसभेत बोलत होते.
मोदी म्हणाले, "जर सपा आणि काँग्रेस सत्तेवर आले, तर रामलला पुन्हा तंबूत असतील आणि ते राम मंदिरावर बुलडोझर चालवतील. खरे तर, बुलडोझर कुठे चालवायला हवे आणि कुठे नाही, यासंदर्भात त्यांनी योगी जींकडून ट्यूशन घ्यायला हवी." याशिवाय, जस-जशी निवडणूक पुढे जात आहे, I.N.D.I.A. तील सदस्य कमी होत आहेत. तसेच, ही आघाडी देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवत आहे.
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना मोदी म्हणाले, त्यांना (अखिलेश यादव) ममता बॅनर्जी यंच्या रुपात नव्या काकू मिळाल्या आहेत. समाजवादीच्या राजकुमाराला (अखिलेश यादव) एका नव्या काकूंकडे (ममता बनर्जी) शरण मिळाली आहे. या नव्या काकू बंगालमध्ये आहेत. या काकूंनी इंडी आघाडीला सांगितले आहे की, मी आपल्याला समर्थन करेल, पण बाहेरून."
मोदी म्हणाले, ''चार जून फार दूर नाही. मोदी सरकारची 'हॅट्रिक' होत असल्याचे आज संपूर्ण देश आणि जगालाही माहीत आहे. नव्या सरकारमध्ये मला गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप सारे मोठे निर्णय घ्यायचे आहे. यामुळे मी बाराबंकी आणि मोहनलालगंजमधील लोकांना आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.''