Yogi Adityanath Viral Speech:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देशभरात चाहता वर्ग आहे. आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवत असले तरीही, यापूर्वी ते अनेकदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर आदित्यनाथ यांचा 25 वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
निवृत्त सैन्य अधिकारी अनुप वर्मा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे:-
योगी आदित्यनाथ पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते, तेव्हा त्यांनी सभागृहात संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. हा व्हिडिओ सुमारे 25 वर्षे जुना आहे. योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोरखपूरचे खासदार होते. या व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ खूपच तरुण दिसत आहेत. 1998 मध्ये योगी आदित्यनाथ पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा खासदार राहिले आहेत.
सर्वात तरुण खासदार...व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आणि डोक्यावर पगडी घातलेली दिसत आहे. यासोबतच गळ्यात माळ आणि कपाळावर चंदनाचा टीळा दिसत आहेत. आदित्यनाथ हे 12व्या लोकसभेचे सर्वात तरुण खासदार होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे 26 वर्षे होते.
अशी झाली राजकीय सुरुवातगणितात एमएस्सी करत असताना ते गुरू गोरक्षनाथांवर संशोधन करण्यासाठी गोरखपूरला आले. गोरक्षपीठाधीश्वर महंत अवेदनाथ यांच्या संपर्कात आल्यानंतर ते 1994 मध्ये संन्यासी झाले. चार वर्षांनंतर 1998 मध्ये गोरक्षपीठाधीश्वर यांनी त्यांना आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून 26,000 मतांनी विजयी होऊन ते संसदेत पोहोचले. योगी आदित्यनाथ हे वयाच्या 26व्या वर्षी 12व्या लोकसभेवर निवडून आलेले सर्वात तरुण सदस्य होते. ते सलग पाच वेळा (1998, 1999, 2004, 2009, आणि 2014 च्या निवडणुकीत) गोरखपूरमधून संसदेवर निवडून गेले आहेत.