१० वर्षानंतर पुन्हा एकदा केदारनाथमध्ये पुराचं संकट! पुरामुळे हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेशमध्ये ३४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 02:56 PM2023-07-10T14:56:59+5:302023-07-10T14:58:41+5:30
मागील २४ तासांपासून मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या २४ तासापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांची पातळी मोठ्य प्रमाणात वाढली आहे, हिमाचल प्रदेशमध्ये १० वर्षांपूर्वी १५ ते १७ जून २०१३ रोजी केदारनाथमध्ये जसा पाऊस होता तसाच पाऊस आताही आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स, अरबी समुद्रातून उठणारे राजस्थानमधून येणारे उबदार वारे आणि मान्सूनचे वारे एकत्र येत आहेत. एक दशकापूर्वी केदारनाथ खोऱ्यात असाच पूर आला होता. अगदी तसाच पूर सध्या येत आहे.
“अजितदादांच्या विरोधात बारामतीतून कोण उभे राहणार?”; रोहित पवारांचे सूचक विधान
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस आणि वीज पडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, गेल्या दोन-तीन दिवसांत ३४ जणांच्या मृत्यूबद्दल बोलायचे झाले तर, वीज पडून १७, पाण्यात बुडून १२ आणि अतिवृष्टीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत मान्सूनच्या काळात ११ टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सखल भागात पूर आला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील ७५ पैकी ६८ जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, दोन दिवसांपासून पाऊस आणि पूर येण्याचे कारण मान्सून वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सचे संयोजन आहे. अशा परिस्थितीत भयंकर पाऊस पडतो. प्राणघातक आणि हानीकारक पूर आणि अचानक पूर येतात. भूस्खलन होते. त्सुनामीसारख्या भयानक लाटांसोबत नद्या वेगाने पुढे सरकतात.
१० जुलै २०२३ च्या उपग्रह चित्रात, हिमाचल प्रदेशात मान्सून वारे आणि पश्चिमी विक्षोभ यांच्या संगमाचे दृश्य दिसते. उजवीकडे- १७ जून २०१३ रोजी केदारनाथ खोऱ्यात असेच दृश्य दिसले. यावेळी वेस्टर्न डिस्टर्बन्ससोबतच उत्तर अरबी समुद्रातून वारे वाहत असल्याचेही आढळून आले आहे. राजस्थानमधून जाणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये त्याचे मिश्रण झाले आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये तो थांबला आहे. गेल्या वेळेप्रमाणे केदारनाथ खोऱ्यात विध्वंसाचे ढग थांबले. ही आपत्तीजनक स्थिती आहे.