नव्या कारची ट्रायल घेताना भीषण अपघात; वन अधिकाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 06:36 PM2024-01-09T18:36:55+5:302024-01-09T18:37:32+5:30

क्षेत्राधिकारी (रेंजर) व उप वन क्षेत्राधिकारी (डिप्टी रेंजर) सह ४ जणांचा मृत्यू झाला.

Horrible accident while trying a car, 4 people including a forest officer died in uttarakhand | नव्या कारची ट्रायल घेताना भीषण अपघात; वन अधिकाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू

नव्या कारची ट्रायल घेताना भीषण अपघात; वन अधिकाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू

- उत्तराखंडमधील राजाजी टायगर रिझर्व्हच्या चीला रेंजमध्ये वन्यप्राण्यांच्या सुरक्षा व बचावासाठी खरेदी करण्यात आलेल्या कारचा भीषण अपघात झाला. इलेक्ट्रिक इंटरसेप्टर वाहनाची ट्रायल घेत असताना गाडीचे टायर फुटून वनक्षेत्र अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वाहनाच्या मागील बाजुचे डावीकडील टायर फुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

क्षेत्राधिकारी (रेंजर) व उप वन क्षेत्राधिकारी (डिप्टी रेंजर) सह ४ जणांचा मृत्यू झाला. अपघातावेळी, वन विभागातील वन्य जीव प्रतिपालक महिला अधिकारी वाहनातून उडून जवळच असलेल्या एका कालव्यात पडली. तर, पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ५ जण जखमी झाले आहेत. कालव्यात पडलेल्या अधिकारी महिलेचा  एसडीआरएफ पथकाकडून शोध सुरू आहे. दरम्यान, वाहनातून सर्व अधिकारी व कर्मचारी चिला कार्यालयातून ऋषिकेश येथे जात होते. नवीन वाहनाची ट्रायल घेण्यासाठीच सर्वजण जात होते. मात्र, साधारण ७०० मिटर अंतरापर्यंतचे वाहन पोहोचले असता, अपघाताची घटना घडली. 

वाहनाचा वेग जास्त असल्याने गाडीचे पाठीमागचे टायर फुटल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले होते. त्यामुळे, हे वाहन अगोदर एका झाडावर धडकले. त्यानंतर, चीला कालव्याच्या भिंतीला जोरदार धडक दिली. मृत वन क्षेत्राधिकारी शैलेश घिल्डियाल हे पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ)  उप सचिव मंगेश घिल्डियाल यांचे भाऊ होते. दरम्यान, अपघातातील जखमींवर ऋषिकेश एम्स येथे उपचार सुरू आहेत. इकडे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पौडीचे खासदार तीरथ सिंह रावत यांनी दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला. तसेच, जखमींच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थनाही केलीय.

दरम्यान, उत्तराखंडच्या वनमंत्र्यांनीही दखल घेत घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सदरील वाहन नोंदणीकृत नव्हते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
 

Web Title: Horrible accident while trying a car, 4 people including a forest officer died in uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.