PM मोदींनी तरुणाईला दिलं नवं मिशन; देशाच्या विकासासाठी 'वेड इन इंडिया'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:10 PM2023-12-08T14:10:51+5:302023-12-08T14:11:43+5:30
देवभूमी उत्तराखंड येथे येऊन मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होते. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी येथे आलो होतो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उत्तराखंड ग्लोबल इंवेस्टर्स समिटचे उद्धाटन केले. मी देशातील पैसेवाल शेठ आणि गर्भश्रीमंत लोकांना सांगू इच्छितो की, जर देव जोड्या बनवतो, मग देवाच्या दारात लग्न करण्याऐवजी तुम्ही विदेशात जाऊन लग्नसोहळे का करता. आता, देशातील तरुणांनी 'वेड इन इंडिया मूव्हमेंट' चालवली पाहिजे. येथे, आपल्या भागात लग्नसमारंभ केला तर येथील विकास अधिक होईल. त्यासाठी, डेस्टीनेशन वेडींग उत्तराखंडमध्ये करायला हवं, असे मोदींनी म्हटले.
देवभूमी उत्तराखंड येथे येऊन मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होते. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी येथे आलो होतो. त्यावेळी, माझ्या तोंडून हे शब्द अचानकपणे बाहेर पडले होते, २१ वे शतकातील हे तिसरं दशक उत्तराखंडचे आहे. आता, मी केलेल्या त्या विधानाकडे गांभीर्याने आणि ध्येय भावनाने पाहत आहे, असे मोदींनी म्हटले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच उत्तराखंड येथील धार्मिक प्रार्थनास्थळांना भेटी देतात.
उत्तराखंड: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "मेक इन इंडिया' की तरह एक मूवमेंट चलना चाहिए 'वेड इन इंडिया', शादी हिंदुस्तान में करो। मैं तो चाहूंगा आने वाले पांच साल में अपने परिवार की एक डेस्टिनेशन शादी उत्तराखंड में करिए। अगर एक साल में 5 हजार शादियां भी यहां होने लग जाएं तो… pic.twitter.com/v6lND4EFIv
— ANI_HindiNews (@AHindinews) December 8, 2023
भारतीय संस्कृती आणि सौंदर्य पाहण्यासाठी आज देशातील आणि विदेशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात भारतात पर्यटन करत आहेत. ्लोकांमध्ये भारत दर्शनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. म्हणूनच, आम्ही थीम बेस्ड पर्यटनाची योजना आखत आहोत. भारताचं निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांची जगाला माहिती व्हायला पाहिजे. त्यामध्ये, उत्तराखंड टुरिझम सर्वात प्रभावी ब्रँड बनले, असेही मोदींनी म्हटले.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी येथील लोकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाचाही उल्लेख केला. जनताने स्थीर आणि मजबूत सरकार निवडून दिले आहे. लोकांनी गव्हर्नेंसच्या ट्रॅक रेकॉर्डवरच मतदान केलं आहे. डबल इंजिन सरकारमुळे डबल गतीने विकास केला जात आहे, असे मोदींनी म्हटले. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपला राजस्थान, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळाले आहे.