उत्तराखंडचा वेगाने विकास, उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 07:51 PM2023-09-14T19:51:42+5:302023-09-14T19:52:05+5:30

महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट इंडिया लिमिटेड सोबत १००० कोटी रुपये आणि ई-कुबेर सोबत १६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

Rapid development of Uttarakhand, huge opportunities for industries says Chief Minister Pushkar Singh Dhami | उत्तराखंडचा वेगाने विकास, उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

उत्तराखंडचा वेगाने विकास, उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

googlenewsNext

आज ग्लोबल इन्व्हेस्टर समिट निमित्ताने ITC ने उत्तराखंड सरकारला ५००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला. महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेडसोबत  १००० कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आणि ई-कुबेर सोबत १६०० कोटींवर स्वाक्षरी करण्यात आली. एवढ्या मोठ्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर पहिल्याच दिवशी झालेल्या करारावरून उत्तराखंडबद्दल गुंतवणूकदार किती उत्सुक आहेत आणि सरकारही किती तत्पर आहे हे दिसून येत आहे.

महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड उत्तराखंडमधील विविध ठिकाणी १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील तीन महिन्यांत ४५ रिसॉर्ट्स उभारणार आहे. यामुळे १५०० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. संपूर्ण देशातील कोणत्याही राज्यात महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

डिसेंबर महिन्यात उत्तराखंडमध्ये होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटच्या संदर्भात नवी दिल्लीतील हॉटेल ताजमहाल येथे कर्टन रेझर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तराखंडचा वेगाने विकास होत आहे.  उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत. व्यवसाय करण्यास सुलभतेबरोबरच राज्यात व्यवसाय करण्याची शांतताही आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तराखंडमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसोबत व्यवसाय सुलभ वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकार काम करत आहे. विशेष धोरणांच्या अंमलबजावणीबरोबरच राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आकर्षक आर्थिक प्रोत्साहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या धोरणांमध्ये प्रामुख्याने पर्यटन धोरण-२०२३, MSME धोरण-२०२३, स्टार्टअप धोरण-२०२३, लॉजिस्टिक धोरण-२०२३, खासगी औद्योगिक वसाहतींच्या स्थापनेसाठी धोरण-२०२३ यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, नैसर्गिक वारसा असलेल्या उत्तराखंडला देशातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्याचा सरकारचा संकल्प आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी, सशक्त उत्तराखंड मिशन सुरू करण्यात आले आहे, ज्याअंतर्गत पुढील ५ वर्षांत राज्याचा SGDP दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्याकडून उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-२०२३ चे आयोजन करण्यात येत आहे.

Web Title: Rapid development of Uttarakhand, huge opportunities for industries says Chief Minister Pushkar Singh Dhami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.