लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर घाट धारकाने आपली हद्द सोडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत घुसघोरी चालविली होती. यासंदर्भात आष्टी तहसीलदारांकडेही तक्रार करण्यात आली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडेही तहसीलदाराने अहवाल पाठविल्यानंतरही कारवाई होत नसल्याने लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रकाशित करताच अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हा घाट रद्द करण्याचा आदेश पारीत करण्यात आला.आष्टी तालुक्याच्या वर्धा नदी पात्रात ईस्माइलपूर वाळूघाट असून या नदीपात्राचा निम्मे भाग वर्धा तर निम्मे भाग अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत येतो. यावर्षी प्रारंभी झालेल्या आठ वाळू घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माइलपूर घाटाचाही लिलाव करण्यात आला. हा लिलाव पुलगावच्या बालाजी सर्व्हीसींग सेंटरचे संचालक गुप्ता यांनी २२ लाख ४९ हजार ८५० रुपयात घेतला होता. घाटाचा ताबा मिळाल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतूनच वाळू उपसा करणे बंधनकारक असताना घाटधारकांने अमरावती जिल्ह्यात घुसघोरी चालविली होती. त्याने अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील फत्तेपूर (जावरा) या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला होता.त्यामुळे याप्रकरणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.यासंदर्भात लोकमते वृत्त प्रकाशित करुन हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अधिकाऱ्यांनी फाईलवरची धुळ झटकून कार्यवाहीला गती देत अवघ्य आठ दिवसात घाट रद्दचा आदेश पारीत केला. या आदेशामुळे घाटधारकांला मुदत संपण्यापूर्वीच आपला घाट बंद करावा लागला.सप्टेंबर अखेर वाळूघाटावर बंदीपहिल्या टप्प्यातील आठ वाळू घाटांपैकी ईस्माइलपूर घाट वगळता सर्व घाटांना एप्रिल महिन्यात ताबा दिल्याने जूलै महिन्यातच त्यांची मुदत संपली. विशेषत: यातील शिवणी व धोची घाटही घाटधारकांच्या उपद्रवामुळे मुदतीपूर्वीच रद्द करावा लागला. तर ईस्माइलपूर घाटाला सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असताना तोही घाट मुदतीपूर्वीच रद्द करण्यात आला. सध्या दुसºया टप्प्यातील हिवरा (कावरे) व भगवा या घाटातूनच स्पटेंबर अखेरपर्यंत उपसा करता येणार आहे.दहा घाटांचा झाला होता लिलावजिल्ह्यात यावर्षी दोन टप्प्यात घाटांचा लिलाव करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव(रिठ),नांदगाव(बोरगाव)-२, पारडी (नगाजी) व धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव अशा आठ घाटांचा लिलाव करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात आठ घाटांपैकी दोनच घाटांचा लिलाव झाला. यामध्ये देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे) व हिंगणघाट तालुक्यातील भगवा या वाळूघाटांचा समावेश आहे.
अखेर ईस्माइलपूरचा वाळूघाट केला रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा कारवाई : हद्द सोडून चालविला होता अवैध उपसा