लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषाच करू शकते. हिंदी ही राष्ट्रभाषा असून आतापर्यंत राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विविध परीक्षेत १ कोटी ८० लाख विद्यार्थी सहभागी झालेत. २०१८ हे वर्ष बा बापू १५० जयंती वर्ष आहे. या दृष्टीकोणातून गांधीच्या जीवन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधान मंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी यांनी केले.राष्ट्रभाषा प्रचार समितीच्यावतीने आयोजित राष्ट्रभाषा प्रचारक संमेलन घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेमचंद्र वैद्य, वामन कामडी, प्रचार अधिकारी अशोक शुक्ला, परीक्षा मंत्री प्रकाश बाभळे आदींची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी अनंतराम त्रिपाठी होते. सर्व प्रथम राष्ट्रभाषा महाविद्यालय नागालँड येथील विद्यार्थ्यांनी एक हृदय हो भारत जननी हे गीत सादर केले. वामन कामडी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या स्थापने मागील उद्देश उपस्थितांना सांगून या समितीच्या बाबतची सविस्तर माहिती दिली. अशोक शुक्ला यांनी जगातील १२२ देशांमध्ये हिंदी शिकविली जाते. नवीन पिढींने तांत्रिक शिक्षण इंग्रजीत घेतले असले तरी लोक संपर्काची भाषा हिंदी अवगत करावी व तिचा वापरही करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अशोक शुक्ला यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.४ जुलै १९३६ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाची स्थापना केली. हिंदीचा प्रचार आणि प्रसार करणे हा त्या मागचा उद्देश होता. गांधी दक्षिण आॅफे्रकेतून भारतात आले. तेव्हा त्यांनी गोखले यांना भारत भ्रमणाचा सल्ला दिला.- डॉ. हेमचंद्र वैद्य, सहाय्यक मंत्री,राष्ट्रभाषा प्रचार समिती.
१ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 9:51 PM
संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषाच करू शकते. हिंदी ही राष्ट्रभाषा असून आतापर्यंत राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विविध परीक्षेत १ कोटी ८० लाख विद्यार्थी सहभागी झालेत. २०१८ हे वर्ष बा बापू १५० जयंती वर्ष आहे.
ठळक मुद्देअनंतराम त्रिपाठी : राष्ट्रभाषा प्रचारक संमेलनात ‘गांधी १५०’ वर चर्चा