लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : शेतकºयांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांना बाजार समितीत चांगल्या सोयी-सूविधा मिळाव्या यासाठी १० लाखांचा निधी प्राप्त करून दिला जाईल. हा निधी शिदोरी भवनाकरिता असेल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमिती असलेल्या सेलू येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या धान्य यार्डच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. सदर नवीन धान्य यार्डला संत केजाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. व्यासपीठावर भारतीय खाद्य निगमचे केंद्रीय सदस्य विजय हटवार, माजी आमदार सुरेश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे, माजी सभापती बबनराव हिंगणेकर, नगराध्यक्ष राजेश जयस्वाल, आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या धान्य शेडचे संत केजाजी महाराज धान्य शेड असे नामकरण करण्यात आले.या बाजार समितीत ई-लिलाव पद्धतीचा शुभारंभ व संगणकीय कक्षाचे उद्घाटन सुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात नैसर्गिक आपत्तीमुळे बैलाचा मृत्यू झालेल्या शेतकºयांना मदतीचा धनादेशाचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी गुणवंत शेतकरी पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती विद्याधर वानखेडे केले. कार्यक्रमाचे संचालन श्याम वानखेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप गावंडे यांनी मानले. कार्यक्रमाला एमगिरीचे प्रमुख प्रफुल्ल काळे, खाद्य निगमचे विजय हटवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, मिलिंद भेंडे यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्ती, शेतकरी व संत केजाजी महाराजांचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुम्ही आमच्यात याकार्यक्रमात मंचावर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. बाजार समितीत सुरेशभाऊंनी मला सोबत घेतले. पुढेही सोबत ठेवा, असे शेखर शेंडे यांनी यावेळी सांगितले. मी दाआजींचाच कार्यकर्ता होतो. मला राजकारणातही त्यांनी आणले. आता मी भाजपात तर आहो सुरेशभाऊ तुम्ही ही भाजपात, या अशी गुगली यावेळी खा. रामदास तडस यांनी टाकली. शेतकरी हितासाठी जिल्हास्तरावर राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करू, असे आवाहन मार्गदर्शन करताना माजी आमदार सुरेश देशमुख यांनी केले.सदर बाजार समितीत श्रीकृष्ण जिनिंगला कापूस विकेलेल्या अनेक शेतकºयांना चुकारा मिळालेले नाही. खासदार, आमदार व शेतकरी यांची मुंबई येथे मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. चुकारा देण्याचे पत्रही निघाले. परंतु, मुख्यमंत्र्यांचे सचिव बदलल्याने काम रेंगाळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळतात हे वास्तव आहे. टालाटुले सदर जिनिंगचे मालक असले तरी प्रलंबित असलेले कापसाचे चुकारे लवकरच संपूर्ण शेतकºयांना देण्यात मिळतील.- रामदास तडस, खासदार, वर्धा.
शिदोरी भवनासाठी बाजार समितीला १० लाख देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:07 AM
शेतकºयांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांना बाजार समितीत चांगल्या सोयी-सूविधा मिळाव्या यासाठी १० लाखांचा निधी प्राप्त करून दिला जाईल.
ठळक मुद्देरामदास तडस : कृउबासच्या नव्या यार्डला संत केजाजींचे नाव व शेडचे लोकार्पण