वर्धा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सुमारे १०० कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडले आहे. याबाबत अद्यापही कोणतेही पावले उचलली गेली नाही. सोमवारी पार पडलेल्या जि.प.च्या स्थायी समितीच्या तहकूब सभेत या विषयावर चर्चेअंती न्यायालयात धाव घेण्याचा ठराव सर्वांनुमते घेण्यात आला. सदर रक्कम बँकेत अडकून पडल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसली आहे, ही बाब अरूण उरकांदे यांनी उपस्थित केली. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या, परंतु कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसल्याचे सभागृहाला सांगितले. यावर सभाध्यक्ष विलास कांबळे ही बाब गंभीर असल्याचे सांगून या संदर्भात उच्च न्यायालयात तात्काळ रिट पिटीशन दाखल करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसा ठरावच यावेळी पारीत करण्यात आला. सभेत गावठाणाबाहेर कार्यवाही करण्याचे अधिकार ग्रा.पं.ला नाही. हा अधिकार देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला. निवडणुकीच्या कामात मागील दोन-तीन वर्षांपासून जि.प.चे कर्मचारी गुंतले आहे, ही बाब मनोज चांदुरकर यांनी सभेत उपस्थित केली. तेव्हा तात्काळ परत बोलाविण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा बँकेत ग्रा.पंं.चे १०० कोटी
By admin | Published: December 29, 2014 11:48 PM