लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने प्लास्टिक बंदी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या अंतर्गत वर्धा शहरात नगर पालिकेतर्फे व्यवसायिकांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी न.प.च्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून भामटीपूरा भागातील हिरा सेल्स या व्यावसायिक प्रतिष्ठानातून एक दोन नव्हे तर तब्बल १०० किलो कमी कमी जाडीचे प्लास्टिक व थर्माकोल जप्त केले. शिवाय सदर व्यावसायिकाला पाच हजारांचा दंड ठोठावून त्याची वसूली केली.शनिवारी व रविवारी प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविल्यानंतर सोमवारचा खंड देत मंगळवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, स्वच्छता व आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, गुरूदेव हटवार, सतीश पडोळे, स्रेहा मेश्राम, नवीन गुणाडे, मनीष मानकर आदींनी शहरातील विविध भागातील व्यावसायिकांना कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल अशा सूचना दिल्या. ही मोहीम राबविताना भामटीपूरा भागातील हिरा सेल्से या व्यावसायिक प्रतिष्ठाणात बंदीच्या नियमाकडे पाठ करीत कमी जाडीच्या प्लास्टीकचा व थर्माकोलचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने ते जप्त करण्यात आले. शिवाय ६ हजारांचा दंड ठोठावून तो वसूल करण्यात आला.वारंवार सुचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईकमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. शिवाय जो कुणी सदर प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करताना आढळेल त्याच्यावर दंडात्मक तर जो वारंवार सुचना देऊनही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानेल त्याच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे.कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्याने सध्या काही प्रमाणात कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांसह व्यापाºयांकडून केल्या जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांसह व्यावसायिकांनीही कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन न.प.च्यावतीने करण्यात आले आहे.
१०० किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:24 AM
राज्य शासनाने प्लास्टिक बंदी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या अंतर्गत वर्धा शहरात नगर पालिकेतर्फे व्यवसायिकांवर कारवाई केली जात आहे.
ठळक मुद्देपालिकेची कारवाई : व्यावसायिकाला ठोठावला दंड