शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

चिमणी-पाखरांच्या निवासासाठी उभारले १०० पाणवठे

By admin | Published: March 26, 2016 1:59 AM

बालपणी चिमणी चिमणी पाणी दे... कावळ्या कावळ्या उब दे... असे म्हणत हळूहळू पक्ष्यांसोबत लाहान मुलांची मैत्री होत असे.

उपक्रम : पक्ष्यांसाठी प्रत्येकाने घराबाहेर पाणी व अन्न ठेवण्याचे आवाहनवर्धा : बालपणी चिमणी चिमणी पाणी दे... कावळ्या कावळ्या उब दे... असे म्हणत हळूहळू पक्ष्यांसोबत लाहान मुलांची मैत्री होत असे. याचीच आठवण म्हणून व पाखरांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी आर्वी नाका परिसरातील गजानन नगर वॉर्डातील विशाल हजारे मित्रपरिवारातर्फे वर्धा शहर, सेवाग्राम नालवाडी, प्रताप नगर, गीताई मंदिर, गजानन नगर, म्हाडा कॉलनी आदी परिसरात १०० पाणवठे लावण्यात आले. सदर उपक्रमात परिसरातील बहुसंख्य नागरिक तसेच महिला व लहान मुलांनीही सहभाग घेतला होता. कार्यक्रमाप्रसंगी पक्ष्यांवर बदलत्या पर्यावरणाचा होत असलेला परिणामी याविषयी विशाल हजारे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करून पर्यावरण संतुलित ठेवणे ही अपली जबाबदारी आहे. रासायनिक खातांचा वापर न करणे, वृक्ष तोड टाळून वृक्ष संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या अंगणात पक्ष्यांसाठी पाणी व अन्न ठेवा असे आवाहन हजारे यांनी केले. दत्ता चिमलवार म्हणाले, सध्या होत असलेला अवकाळी पाऊस, ध्वनी प्रदुषण तसेच मोबाईल टावर यामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे. त्यांना वाचविण्याकरिता एकजुटीने असे प्रकल्प हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राजेंद्र घोडमारे म्हणाले, आपल्या भोवतालच्या आसमंत हा असंख्य सजीव व निर्जीव घटकांनी बनला आहे. सृष्टीचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक प्राणी जगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगर सेवक डब्बू शर्मा, दिनेश काळे, किशोर गुजरकर, किशोर ठाकरे, गजानन तेलहांडे, आरिफ कासामाणी यांनीही विचार व्यक्त केले. संचालन सचिन बनसोड यांनी केले. यशस्वीतेकरिता शंकर राऊत, श्याम जगताप, विठ्ठल हांडे, सुरेश ढोडरे, चेतन कांबळे, आनंद हांडे, बोरकुटे, किशोर ठाकरे, सुधीर शिंदे, रणजित रेवतकर, नितीन वाकाडे, राजेंद्र इंदोरीया, मनोहर मानकर, दिगांबर फाले, उदय बनकर, राहुल बोबडे, महेश जगदणे, सुभाष उभाळकर, आकाश पारधी, राहुल बोबडे, आकाश बावणे, होलेश्वर ताजणे, प्रथमेश हांडे, अतुल लाखे, गौतम देशभ्रतार ंआदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी) हॉर्नबिल (धन्चीडी) संवर्धन अभियानपक्षांच्या नामशेष होत चालेल्या जातीचे जतन व्हावे, यासाठी बोरगाव(गोंडी) यथील वनरक्षक मनीष कुमार सज्जन, वनपरिक्षेत्र अधिकारी खरांगणा व पिपल फॉर अ‍ॅनिमल वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने हॉर्नबिल(धन्चीडी) या पक्ष्यांकरिता करिता लाकडांचे कृत्रिम घरटे तयार करून जंगलात लावण्यात आले. वनव्यवस्थापन समिती बोरगाव गोंडी तसेच वन सरंक्षण पथक खरांगणा वनपरिक्षेत्र समितीचे सर्व कार्यकर्ते या उपक्रमात सहभागा झाले होते.सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता वनवरक्षक सज्जन तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, पिपल फॉर अ‍ॅनिमलचे सुमित जैन, अमित बाकडे, अभिषेक गुजर, कौस्तुभ दानी, रोहित कान्गले, लखन येवले, कौस्तुभ गावंडे, आशिष गोस्वामी यांनीहे परिश्रम घेत आहे. राखी शिंगचोचा म्हणजे ग्रे हॉर्नबिलचा अंडी देण्याचा काळ साधारणपणे मार्च ते जून महिने असाआहे. तिचे घरटे झाडांच्या ढोलीत असते. मादी ढोलीत बसल्यावर नर आणि मादी फक्त थोडी फट ठेवून ती ढोली आपल्या विष्टेने बंद करून घेतात. या घरट्यात मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते. नर घरट्याबाहेर राहून ढोलीतील मादीला अन्न खाऊ घालतो. मादी ढोलीत राहून अंडी उबविण्याचे काम करते. अंड्यातून पिले बाहेर आल्यावर मादी आपल्या घरट्याचे आवरण फोडून बाहेर येते. नर आणि मादी पुन्हा ती ढोली पूर्वीसारखीच बंद करून घेतात आणि आतील पिलांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोघेही पिलांना अन्न खाऊ घालतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर पिले आपले घरटे फोडून बाहेरच्या जगात येतात