लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी प्रत्येकाला आपले अश्रू अनावर झाले होते.रमेश वरकड हे मितभाषी व सर्वांना घेऊन चालणारे होते. आंतरजातीय विवाहाला त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिले. स्वत: जीवनसाथी निवडताना बौद्ध समाजातील मुलीला पसंती दर्शविली. त्यांच्या मुलीचा विवाह ख्रिश्चन धर्माच्या मुलाशी लावून दिला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार माणून आज सर्वांतून अचानक ५८ व्या वर्षी निघून गेल्याने साहुर गावकरी जणू हवालदिल झाले आहेत. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणा देणाराच आहे. रमेश वरकड यांचे कुटुंब यवतमाळ येथे वास्तव्यास आहे; पण त्यांनी आपले जीवन साहुर गावाला समर्पित केले होते. १५ वर्ष सरपंच, १० वर्ष जि.प. सदस्य, पं.स. उपसभापती अशा पदांची जबाबदारी सांभाळून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटविला होता. गेल्या ८ वेळा म्हणजे ४० वर्षे त्यांनी ग्रा.पं.वर एकहाती सत्ता मिळविली. सरपंच कोणीही असो; पण काम रमेश वरकड यांची संमती असेलच तरच होणार आणि तेही फक्त लोकाभिमुख असेच चित्र येथे बघावयास मिळत होते. कुणाच्या सांगण्याने व विश्वास ठेवून त्यांनी कधीही राजकारणात डाव मांडला नाही. मध्यंतरी महिला आरक्षण निघाल्याने त्यांच्या सुनेला तिकीट देवून जि.प. सदस्य बनविले. मात्र, राजकारणाची सुत्र रमेश वरकड यांच्याकडे ठेवण्यात यावी असाच कुटुंबाचाही आग्रह त्यांनी पूर्ण केला. साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राला जागतिक स्तरावर पुरस्कार प्राप्त करून देण्यात रमेश वरकड यांचा मोठा हात भार होता. कारण सुमारे एक कोटी रुपये एवढा मोठा निधी जि.प. मधून क्रमाक्रमाने आणत संबंध विकासकामे पूर्ण केली. मशीनयंत्र सुविधा, आरोग्य सुविधा यामध्ये त्यांनी मोठ्या शिताफीने तत्परता ठेवली होती. ग्रा.पं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रमेश वरकडे हे भोवळ येऊन पडले. तेथे २२ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण त्यांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. रुग्णालयात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह भाजपाच्या काही बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. साहुर येथील मंजुळा नदीच्या पात्रातील उत्तरवाहिनीमध्ये मानव जोडो संगठनचे प्रणेते रमेश सरोदे यांच्यावतीने ग्रामगीता वाचन करण्यात आले. त्यानंतर १०८ जणांनी मुंडण करून दशक्रिया विधी पार पाडला.
१०८ जणांनी मुंडण करून अर्पण केली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:55 PM
गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
ठळक मुद्देसाहूर परिसरात शोककळा : रमेश वरकडे यांचा दशक्रिया विधी