नेत्र तपासणी पंधरवडा : उपचारानंतर चष्म्यांचे वाटपदेवळी : जागतिक नेत्र जागृती पंधरवडानिमित्त स्थानिक राममंदिर देवस्थान येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंकज तडस व मित्र परिवाराच्यावतीने आयोजित शिबिरात नागपूरच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने ही तपासणी केली. शिबिराच्या अध्यक्षस्थानी ताराचंद चौबे तर अतिथी म्हणून राम तडस, वामन तेलरांधे, प्रा. केशव कुवारे, रमेश वैद्य, माजी मुख्याध्यापक रमेश कळसकर, विश्वनाथ खोंड व घोंडबाजी डायरे आदी उपस्थित होते. कुटुंबातील ज्येष्ठ एका विशिष्ट वयानंतर दुर्लक्षित ठरतात. त्यांना जडलेल्या आजाराची दखल घेतली जात नसल्याने ते उपेक्षित ठरतात. त्यामुळे अश्या पितृतुस्य गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पंकज तडस यांनी सांगितले. शिबिरात अकराशे रुग्णांची नेत्रतपासणी करुन त्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच डोळ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय लहाने, डॉ. मून, डॉ. भांदककर, डॉ. ईसार खान, डॉ. निकिता मेश्राम, डॉ. प्रणाली राजनेकर यांनी तपासणी केली. यशस्वीतेकरिता अश्विन कारोटकर, अतुल कुऱ्हटकर, राम खोंड, उमेश तेलरांधे, विजय सोनटक्के यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
११०० नेत्ररुग्णांची तपासणी व उपचार
By admin | Published: August 29, 2016 12:37 AM