लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येत्या रविवारपासून पोलिओ लसिकरणाची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ६ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.सन २०१७-१८ मध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जानेवारी व ११ मार्च २०१८ रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आरोग्य विभाग, आयसीडीएस विभाग, शिक्षण विभाग, ग्रामसेवक, तलाठी व विशेषत: रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, आय.एम.ए. जिल्हा होमगार्डस, याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे योगदान राहणार आहे. प्रत्येक पालकाने राष्ट्रीय कर्तव्य समजून आपल्याकडील व परिसरातील सर्व ५ वर्षांच्या आतील बालकांना पोलिओ लसीकरण केंद्रांवर नेऊन लस पाजून घ्यावी आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा पल्स पोलिओ लसीकरण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. पी.डी. मडावी, सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, तसेच जिल्हा पल्स पोलिओ लसीकरण समन्वय समितीचे सर्व सदस्यांद्वारे करण्यात येत आहे.३,२६० कर्मचारी व २६९ पर्यवेक्षकया मोहिमेकरिता जिल्ह्यात १३४० लसीकरण केंद्राची व्यवस्था केली आहे. यात ग्रामीण भागात ११३९ तर शहरी क्षेत्रात २०१ केंद्रे आहेत. या मोहिमेत एकूण ३,२६० कर्मचारी व २६९ पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत. यावर्षी ग्रामीण भागातील ८४,८४५ लाभार्थींना व शहरी भागातील ३१,१६१ असे एकूण १,१६,००६ लाभार्थ्यांना पोलीओचा डोज पाजण्यात येणार आहे. याशिवाय टोल नाके, बसस्टँड, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी ८६ ट्रान्झीट व ९३ मोबाईल टिम्सद्वारे भटक्या कुटुंबातील बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे.
१.१६ लाख बालकांना मिळणार पोलिओची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:21 PM
येत्या रविवारपासून पोलिओ लसिकरणाची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ६ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देजिल्हाभरात १,३४० लसीकरण केंद्र