शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

१२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:23 PM

स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती.

ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : बजावला होता नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती.शहरातील बहूतांश धार्मिक स्थळ रहदारिस व शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत त्यांना नोटीस बजावण्यात आला होता. सदर नोटीस बजावल्यानंतर काही धार्मिक स्थळ यापूर्वी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केली होती. त्यानंतर आज ही मोहीम पुन्हा नव्या जामाने राबविण्यात आली. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौक, धंतोली, न्यु इंग्लिश शाळा, गोंडप्लॉट व सुदामपुरी भागातील अतिक्रमण करून बांधण्यात आलेली सुमारे १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने पाडली.ही मोहीम न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, सुधीर फरसोले, अशोक वाघ, दिनेश नेरकर, सतीश जाधव, प्रविण बोरकर, रवी जगताप, चेतन खंडारे, चेतन कहाते, गजानन पेटकर, ऐजाज फारुकी, मुकीम शेख, स्वप्नील खंडारे, चंदन महत्त्वाने, प्रदीप मुनघाटे, नाना परटक्के, आशीष गायकवाड, निखिल लोहवे, अशोक ठाकूर, प्रविण बोबडे, विशाल सोमवंशी, बाळकृष्ण भोयर, मनिष मानकर, सुजीत भोसले, जगदीश गौतम, अक्षय बालेगिनवार, आकाश मरघडे, नितीन जांभुळकर आदींनी केली.अन्यथा शिवसेना उतरेल रस्त्यावर - सराफसार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळ पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने शहरातील धार्मिक स्थळे पाडण्याचे काम न.प. प्रशासन करीत आहे. या मोहिमेमुळे अनेकांच्या भावना दुखावत असून नागरिकांकडून त्याचा विरोधही होत आहे. न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही मंदिरातील मूर्तीची विटंबना करून लोकांच्या भावना दुखावू नये. असे झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, अशा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांनी सदर मोहीम सुरू असताना न.प. अधिकाऱ्यांशी भेटून दिला. यावेळी शिवसेनेचे किशोर बोकडे, बादल श्रीवास, संजय पांडे, कुणाल मोरे, अमर गुंदी, विशाल व्यास आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणTempleमंदिर