शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

प्रतिपूर्तीच्या १.२० कोटींचे वाटप

By admin | Published: June 13, 2017 1:10 AM

‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत.

आरटीई अंतर्गत प्रवेश : तीन वर्षांतील थकबाकी मिळणार एकाच वेळीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत. यापोटी शासनाकडून सदर शाळांना प्रतिपूर्ती केली जाते. २०१२ ते २०१५ पर्यंतची यातील काही रक्कम थकित होती. त्या रकमेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाला यातील १ कोटी २० लाख ८४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. यात तीनही वर्षांची शिल्लक १ कोटी २० लाख २५ हजार ९९० रुपयांचे वाटप लवकरच इपीएसद्वारे करण्यात येणार आहे.शिक्षण विभागाने यापूर्वी २०१२-१३ व २०१३-१४ या दोन सत्रातील १४२ शाळांना २ हजार ५४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ७५ लाख २ हजार २३९ रुपये वितरित करण्यात आले होते. यातील उर्वरित रक्कम आता वितरित होणार ओह. शिवाय २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या प्रतिपूर्तीची रक्कम शिल्लक होती. आता शिक्षण विभागाला यापोटी निधी मिळाल्याने थकित प्रतिपूर्तीच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१४-१५ या सत्रात ९२ शाळांमध्ये २ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशित होते. २०१५-१६ मध्ये १०० शाळांमध्ये ३ हजार ६४४ विद्यार्थी तर २०१६-१७ मध्ये १२० शाळांमध्ये आरटीई २५ टक्के अंतर्गत ४ हजार १८२ विद्यार्थी प्रवेशित आहेत. २०१५-१६ या सत्रासाठी शिक्षण विभागाने शासनाकडे २ कोटी १८ लाख २८ हजार ५९६ रुपयांची मागणी केली होती. २०१६-१७ या सत्रासाठी ही मागणी २ कोटी ८५ लाख ५० हजार ९८४ रुपये एवढी आहे. शिक्षण विभागाला २०१६-१७ या सत्रासाठी तुर्तास ७० लाख ६३ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तीन वर्षांची थकित रक्कम वितरित केल्यानंतर ५८ हजार १०० रुपये शिल्लक राहणार आहे. या शिल्लक व प्राप्त रकमेतून २०१५-१६ सत्रातील प्रत्येक शाळेला १०.७४ टक्के रकमेचे वाटप केले जाणार आहे. प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शाळा आरटीई अंतर्गत राखीव प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत होती. यामुळे उपशिक्षणाधिकारी हजारे यांनी पाठपुरावा करीत ही रक्कम प्राप्त करून घेतली आहे. आता थकित रकमेचे वाटप होणार असल्याने शाळांनाही दिलासा मिळणार आहे. यंदा १३६८ विद्यार्थ्यांचे प्रवेशआरटीई कायद्यांतर्गत २०१७-१८ या सत्रासाठी जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर १३६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यासाठी आलेल्या अर्जांतून २३४७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडे २५ टक्के प्रमाणे १५६८ जागा आहेत. प्रवेशाच्या सात फेऱ्या आटोपल्या असून आणखी १९९ जागा शिक्षण विभागाकडे शिल्लक आहेत. या जागांवरही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.